WhatsApp : 36 लाख वापरकर्त्यांची खाती केली बंद! तुम्हीही करत नाही ना ही चूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp : जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या याच वापरकर्त्यांना खूप मोठा झटका दिला आहे. कारण कंपनीने एकाच वेळी 36 लाखांपेक्षा जास्त भारतीय वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत.

वापरकर्त्यांच्या चुकीमुळेच कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्हीही काही चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुमच्यावरही कारवाई करून तुमचेही व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद केले जाऊ शकते.या वापरकर्त्यांवर का कारवाई केली जाणून घेऊयात सविस्तर

याबाबत कंपनीने दिली ही माहिती

1 डिसेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान 36.77 लाख भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यापैकी 13.89 लाख खाती भारतीय वापरकर्त्यांच्या तक्रारींच्या आधारे बंद केली आहेत. तर नोव्हेंबरमधील 946 तक्रारींच्या तुलनेत डिसेंबरमध्ये WhatsApp वापरकर्त्यांकडून अपील 70 टक्क्यांनी वाढून 1607 वर आली असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

त्यापैकी कंपनीने केवळ 166 अपीलांवर प्रक्रिया केली असून पूर्वीची तिकिटे आणि डुप्लिकेट तिकिटे वगळता सर्व तक्रारींना उत्तर देऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. कंपनीने डिसेंबरमध्ये देशात 37.16 लाख अकाउंट्सवर बंदी घातली होती, त्यापैकी 9.9 लाख खाती सक्रियपणे बॅन केली होती.

आयटी कायदा 2021 अंतर्गत करण्यात आली कारवाई

नवीन आयटी नियमांतर्गत वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा विचार करून या खात्यांवर बंदी घातली आहे. IT कायदा 2021 अंतर्गत, 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक महिन्याला आयटी मंत्रालयाला वापरकर्ता सुरक्षा अहवाल सादर करावा लागतो.

नोव्हेंबरमध्ये 37 लाखांपेक्षा जास्त खाती बंद केली

1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान 37 लाखांहून अधिक भारतीय खाती बंद केली आहेत. युजर्सच्या तक्रारीच्या आधारे ही खाती बॅन केली असून यापैकी 10 लाख खाती अशी होती जी भारतीय वापरकर्त्यांनी फ्लॅग केली होती.