Agriculture Business Idea : या शेतीपूरक व्यवसायाची सुरवात करा आणि कमवा बक्कळ नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Business Idea :- मित्रांनो तुम्ही शेतकरी (Farmer) आहात का? हो मग तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवायचे (How To Double Income) असेल बरोबर ना! असे असेल तर मग आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी.

शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीसोबतच काही शेतीपूरक व्यवसाय (Agricultural Business) देखील सुरू करू शकता, हे व्यवसाय तुम्ही कमी खर्चात सुरु करू शकता आणि चांगला बक्कळ पैसा कमवू शकता.

विशेष म्हणजे आपण शेतीपूरक व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करू शकता आणि यासाठी आपणास कुठलेही प्रशिक्षण घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.

आज आपण काही शेती पूरक व्यवसायांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

दुग्ध व्यवसाय (Dairy business) दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक व्यवसायापैकी सर्वोत्तम फायदेशीर व्यवसाय आहे, कारण की या व्यवसायाला बारामाही मागणी असते. गावातील बहुतेक शेतकरी तसेच भूमिहीन पशुपालन करतात, यातून चांगले दूध मिळते.

त्यांच्या दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. जसे की लोणी, चीज, तूप, दही, आईस्क्रीम इ. या उत्पादनांची मागणी वर्षभर बाजारात राहते आणि त्याच वेळी त्यांच्या किमतीही चढ्या असतात. आपण देखील डेअरी व्यवसायात गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता.

पशुखाद्य व्यवसाय (Animal feed business) मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे गावातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी पशुपालन करतात. यामुळे जनावरांना चारा देखील मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो. म्हणुन जर आपण याचा व्यवसाय गावात सुरू केला तर तुम्हाला कमी काळात चांगला नफा मिळू शकेल.

यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याचीही गरज नाही. दुकानापासून ते इतर पशुखाद्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च करावे लागतील. एकदा व्यवसाय चांगला चालू लागला की, तुम्ही दर महिन्याला मोठी रक्कम कमवू शकता.

कुक्कुटपालन (Poultry farming Business) बाजारात कोंबडीच्या अंडीला आणि मांसाला नेहमीच मागणी असते. विशेषता गावठी कोंबडीच्या अंड्याला व मांसाला अधिक मागणी असते अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील कुक्कुटपालन व्यवसाय केला तर यातून जास्तीत जास्त नफा मिळेल.

कृपया लक्षात घ्या की, बाजाराच्या मागणीनुसार कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करा. आपण कोंबडी किंवा अंडी विकु शकतात यामुळे हा एक दुहेरी फायदा देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते. त्यामुळे शेतकरी बांधव आणि गरीब लोकांसाठी हा व्यवसाय खूप चांगला सिद्ध होऊ शकतो.