अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ९८२ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१० टक्के इतके झाले आहे.दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २३५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७० आणि अँटीजेन चाचणीत १६० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव ०१, नगर ग्रा. ०१, पारनेर ०१ आणि पाथर्डी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रा.०३, नेवासा ०४, पारनेर ०८, पाथर्डी ०२, राहुरी ०३, संगमनेर १६, शेवगाव ०३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६० जण बाधित आढळुन आले. अकोले २१, जामखेड १७, कर्जत ०५, कोपरगाव ०५, नगर ग्रा. ०३, नेवासा ०७, पारनेर २६, पाथर्डी १०, राहाता १०, राहुरी १४, संगमनेर ०७, शेवगाव ०८, श्रीगोंदा १७ आणि श्रीरामपूर १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ०७, जामखेड ०८, कर्जत ०८, कोपरगाव १७, नगर ग्रा. ०६, नेवासा १२, पारनेर ४५, पाथर्डी २४, राहता ४१, राहुरी ११, संगमनेर १८, शेवगाव २६, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,७०,९८२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२२३५
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:५८७२
  • एकूण रूग्ण संख्या:२,७९,०८९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)