Ajab Gajab News : जगातील या धोकादायक ठिकाणी १०० वर्षांपासून कोणीही गेलं नाही; प्राण्यांनाही आहे सक्त मनाई…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : जगात अशा काही गोष्टी घडत असतात त्यावर लवकरात लवकर कोणीही विश्वास ठेऊ शकणार नाही. तसेच अशा काही जागा आहेत त्या ठिकाणांविषयी (places) अनेक रहस्यमय कथा (Mysterious story) असतात. त्या ठिकाणी वर्षानुवर्षे कोणीही जात नाही. आज तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.

तिथे कोणी येत नाही किंवा जात नाही. वास्तविक, 100 वर्षांपूर्वी या ठिकाणी लोक राहत होते, परंतु नंतर घडलेल्या एका घटनेमुळे आता कोणीही तेथे जात नाही.

त्या ठिकाणी प्राण्यांनाही जाण्यास मनाई आहे. हे ठिकाण फ्रान्सच्या (France) उत्तर-पूर्व भागात आहे. येथे लोक न येण्यामागे एक धोकादायक कथा आहे, जी आश्चर्यकारक आहे.

या ठिकाणाचे नाव ‘झोन रोग’ (zone disease) आहे. तो इतका धोकादायक आहे की, ठिकठिकाणी ‘डेंजर झोन’चे फलक लावले आहेत. चुकूनही या ठिकाणी कोणी आले, तर तो हा फलक वाचून पुढे जाण्याची चूक करू नये, यासाठी हे करण्यात आले आहे.

मात्र, या ठिकाणी कोणीही येऊ नये म्हणून हे ठिकाण फ्रान्सच्या इतर भागांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. हे ठिकाण ‘रेड झोन’ म्हणूनही ओळखले जाते. असे म्हणतात की पहिल्या महायुद्धापूर्वी या भागात एकूण नऊ गावे होती,

जिथे लोक शेती करून राहत होते. पण महायुद्धाच्या काळात या जागेवर इतके बॉम्ब पडले की संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला, अनेक लोक मारले गेले आणि ही जागा राहण्यायोग्य राहिली नाही.

या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त युद्ध साहित्य पसरले आहे, त्यामुळे येथील जमीन विषारी बनली असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर येथील पाण्यात प्राणघातक घटकही आढळतात.

हा परिसर खूप मोठा असल्याने आणि संपूर्ण परिसराची जमीन आणि पाणी रसायनमुक्त करणे शक्य नसल्याने फ्रेंच सरकारने लोकांना येथे येण्यास बंदी घातली. 2004 मध्ये येथे माती आणि पाण्याची चाचणी करण्यात आली,

ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्सेनिक आढळून आले. आर्सेनिक हा असा विषारी पदार्थ आहे, जर त्याची थोडीशी मात्रा चुकून माणसाच्या तोंडात गेली तर काही तासांत त्याचा मृत्यूही होऊ शकतो.