Bharti Airtel : देशात 5G सेवा सुरू होण्यापूर्वी एअरटेलचे शेअर्स पोहोचले विक्रमी पातळीवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bharti Airtel : देशात उद्यापासून 5G सेवा (5G services) सुरू होणार आहे. ही सेवा टप्प्याटप्प्यात सुरु केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 13 शहरातील नागरिकांना 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे.

ही सेवा (5G) सुरु होण्याआधीच भारती एअरटेलच्या शेअर्सनी (Bharti Airtel Shares) विक्रमी पातळी गाठली आहे. हे शेअर्स ( Airtel Shares) 6 टक्क्यांनी वाढले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, PM मोदी (PM Modi) उद्या देशातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करतील आणि पुढील काही वर्षांत ती हळूहळू देशभर विस्तारली जाईल. 5G स्पेक्ट्रम लिलावात भारती एअरटेलने 43,039.63 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती.

ट्रेडिंगच्या शेवटी, एअरटेलचे शेअर्स NSE वर 4.57% वाढून Rs 799.60 वर बंद झाले. एअरटेलच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 8.78% टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, 2022 च्या सुरुवातीपासून, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 15.67% परतावा दिला आहे.

SingTel 1.59% हिस्सेदारी परत विकत घेतली

Pastel Ltd, सिंगापूर टेलिकम्युनिकेशन्स लिमिटेड (SingTel) च्या युनिटने 22 सप्टेंबर रोजी भारती एअरटेलमधील 1.59% हिस्सा 7261 कोटी रुपयांना विकला. भारती एअरटेलची प्रवर्तक कंपनी भारती टेलिकॉम लिमिटेडने हा हिस्सा खरेदी केला आहे.

Pastel ने भारती एअरटेलचे 9,40,00,000 शेअर्स म्हणजेच 1.59% स्टेक 772.5 रुपये प्रति शेअर या दराने विकले आहेत. या व्यवहारानंतर, भारती एअरटेलमधील पेस्टलची शेअरहोल्डिंग 12.21% वरून 10.62% वर आली आहे.

जून तिमाहीच्या अखेरीस Pastel ची भारती Airtel मध्ये 13.84% हिस्सेदारी होती. यासोबतच भारती ग्रुपचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल कुटुंबीय आणि सिंगटेल यांची भारती एअरटेलमध्ये हिस्सेदारी आहे.

स्टॉकबद्दल तज्ञांचे मत काय आहे?

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने या महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या अहवालात भारती एअरटेलच्या शेअर्सला 1032 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदी रेटिंग दिली आहे. हे कंपनीच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 30 टक्क्यांनी अधिक आहे.