भावा झकास! MBA केलेल्या तरुणाने जॉब सोडून सुरु केले मत्स्य पालन; आज वार्षिक दहा लाखांची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Fisheries Business  :- आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती (Agriculture) आहे मात्र असे असले तरी नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे वारंवार शेतकऱ्यांना सहन करावे लागणारे नुकसान.

मात्र ही तर नाण्याची एक बाजू झाली दुसरी बाजू निश्चितच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. देशात असेही नवयुवक आहेत ज्या आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि योग्य नियोजनाने तोट्यात चाललेल्या शेतीला फायद्याची करत आहेत आणि हिच नाण्याची दुसरी बाजू आहे.

आज आपण बिहार मधील एका सुशिक्षित नवयुवक शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. यामुळे शेती फक्त तोट्याचीच असते असा गैरसमज बाळगणारे नवयुवक शेतीला तोट्याची समजणार नाहीत.

सिवान जिल्ह्यातील महाराजगंज येथील मौजे सिहौता येथील रहिवासी रणजीत कुमार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील प्रभुनाथ सिंग हे आपली वडिलोपार्जित शेती करत आले आहेत. यामुळे रंजीत यांना शेती काही अनोळखी नव्हती. शेती आणि त्यांचे नाते हे नवीन नसल्यामुळे रंजीत यांनी मत्स्य पालन व्यवसायात (Fisheries Business) एक नवीन कीर्तिमान स्थापन केला असेच म्हणावे लागेल.

रंजीत यांनी सांगितले की, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर MBA केले आणि 2009 मध्ये एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे 4 वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. यानंतर कौटुंबिक कारणामुळे तो गावी परतला. 2013 मध्ये रणजित यांनी मत्स्यपालन सुरू केले.

सध्या ते वर्षाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहेत. रणजीत सध्या त्याच्या एकूण चार तलावांमध्ये 6 जातींच्या माशांचे संगोपन करत आहे. एकामध्ये मोठे मासे आणि दुसऱ्यामध्ये मत्स्यबीज ठेवले जातात.

रणजीत कुमार यांनी बोलतांना सांगितलं की, तो पाटणा, छपरा, मोतिहारी, सिवानमध्ये अगदी घरी बसून आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करतो. दुसऱ्याकडे नोकरी करणारा रंजीत आपल्या व्यवसायातून डझनभर शेतकऱ्यांना रोजगार देत आहे. तो इतर शेतकरी बांधवांचे उदरनिर्वाह भागवत असल्याने त्याला यात समाधान आहे.

रंजीत सांगतात की, त्यांच्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेतजमीन आहे. मात्र असे असले तरी, त्यांच्या शेतात पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब केला जात होता यामुळे शेतीतुन उत्पन्न फारसे मिळत नव्हते. त्यामुळेच रणजित यांची इच्छा नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना बीसीएनंतर एम.बी.ए. करण्यास सांगितले जेणेकरून रणजित नोकरीतुन चांगली कमाई करू शकेन आणि आपला उदरनिर्वाह भागवेल.

रणजित यांनी सांगितलं की, एमबीएनंतर त्यांना नोकरीसाठी खूप संघर्ष करावा लागला. तेव्हा त्यांना रिक्त पदाची माहिती लवकर मिळत नव्हती. यामुळे रणजित दिल्लीतील मुखर्जी नगरमधील अनेक कंपन्यांमध्ये गेले, मात्र त्यांना गेटमधून हाकलून देण्यात आले आणि काही ठिकाणी निवड झाली नाही.

अशाच काही महिन्यांनंतर त्यांना एका कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. रणजित यांचे नोकरीत मन रमत नव्हते, असे रणजित यांनी स्वतः सांगितलं. पण घरच्या जबाबदाऱ्या आणि वडिलांमुळे काम करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता.

सुटीच्या दिवसात रणजित अनेकदा मच्छिमारांना भेटत असे. त्याचे काम पाहत असत. यातूनच त्यांना मत्स्यपालन व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. रंजीत यांनी मत्स्य पालन व्यवसाय सुरूदेखील केला आणि आता वार्षिक दहा लाख रुपयांची कमाई देखील करत आहेत.