Business Idea : सरकारकडून पैसे घेऊन सुरु करा ‘हा’ व्यवसाय, थोड्याच दिवसात कमवाल लाखो… सविस्तर पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : कोरोना (Corona) काळापासून तरुणवर्ग नोकरी (Job) सोडून स्वतःचा व्यवसाय (own business) करण्याकडे वळाला आहे. छोट्या व्यवसायामध्ये थोडे पैसे गुंतवून (investing money) व्यवसाय सुरू करता येतो आणि महिन्याभरात भरपूर कमाई करता येते.

वास्तविक आज तुम्हाला आम्ही कटलरी उत्पादन युनिट (Cutlery Manufacturing Unit) व्यवसायाबद्दल सांगणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या (Govt of India) मुद्रा योजनेचीही मदत मिळेल.

कटलरी उत्पादन युनिट हा एक असा व्यवसाय आहे, ज्याची मागणी प्रत्येक घरात कायम आहे. याशिवाय पार्ट्या, लग्नसोहळे, पिकनिक आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये कटलरीला मागणी आहे.

त्याच बरोबर हाताची साधने आणि शेतीमध्ये वापरण्यात येणारी काही महत्वाची साधने देखील कटलरीपासून बनवता येतात. तसेच तुम्ही ते मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकता. यामध्ये घरगुती उत्पादनांव्यतिरिक्त तुम्ही इतर साधने देखील बनवू शकता.

किती खर्च येईल?

त्यात तुम्ही धातूपासून बनवलेल्या कटलरी उत्पादनाचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1.14 लाख रुपये असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता.

सेटअपसाठी तुम्हाला सुमारे 1.8 लाख रुपये खर्च करावे लागतील. यासाठी तुम्हाला वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्राइंडर, हँड ड्रिलिंग, हँड ग्राइंडर, बेंच, पॅनेल बोर्ड आणि इतर साधनांची आवश्यकता असेल.

याशिवाय तुम्हाला कच्च्या मालावर सुमारे 1.2 लाख रुपये खर्च करावे लागतील. या कच्च्या मालातून दर महिन्याला 40,000 कटलरी, 20,000 हाताची साधने आणि 20,000 कृषी अवजारे तयार करता येतील, असे अहवालात म्हटले आहे.

किती कमवाल ते जाणून घ्या

सरकारच्या प्रकल्प अहवालानुसार, तयार उत्पादनाची दरमहा 1.10 लाख रुपयांची विक्री अपेक्षित आहे. त्याच्या निर्मितीसाठी दरमहा 91800 रुपये खर्च येईल. त्यानुसार, दरमहा तुम्हाला 18,000 रुपयांपेक्षा जास्त नफा होईल. कर्जाची परतफेड केल्यानंतर आणि प्रोत्साहन खर्च वजा केल्यावर, तुमचा निव्वळ नफा 14,400 रुपयांपेक्षा जास्त असेल.

कर्जासाठी अर्ज कसा करावा?

तुम्हाला कटलरी व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे अशी सर्व माहिती द्यावी लागेल.