“पण, काल मला एक बाब खटकली, पद गेल्यानंतर फटाके वाजले…” वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी जे वक्तव्य केले त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे पुणे (Pune) शहरप्रमुख वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून हटवण्यात आले त्यानंतर वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले.

वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्यांना पक्षाकडून बलवान आले होते. खुद्द राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे बोलावले होते.

त्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरून (MNS Pune city chief post) काढून टाकण्यात आले आणि पुण्याचे दुसरे नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांना मनसे शहर प्रमुख पद त्यांना देण्यात आले आहे.

वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला. तो जल्लोष 9 जुलै 2021 मध्ये झाला होता. ज्या दिवशी मी त्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं.

पण, काल मला एख बाब खटकली, वसंत मोरेचं पद गेल्यानंतर फटाके वाजले, आनंदोत्सव साजरा झाला, मिरवणूक निघाल्या, असं का? असा प्रश्न वसंत मोरेंनी विचारला.

‘माझे सगळेच कार्यकर्ते, मित्र आणि पदाधिकारीही म्हणतात वसंत मोरे आल्यापासून पक्षात जान आली, पक्ष वाढला आहे. मग, मी इतकी वर्षे पक्षासाठी जे केलं, त्यावर पाणी फिरलं की काय? असं मला वाटतं’ अशी नाराजीही वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत माझं डायरेक्टली बोलणं झालं नाही. शिवसेनेचे (Shivsena) शहरप्रमुख संजय मोरेंचा फोन आला होता. सीएमचा माझ्यासाठी फोन आहे म्हणून सांगत होते. त्यावेळी मी नेमका कात्रजमध्ये नव्हतो. मी सर्वांना सांगितलं मी अजून मनसेत आहे.

माझा पदभार मी साईनाथ बाबर यांच्याकडे दिला आहे. पण मी मनसेतच आहे. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला या म्हणून मला निरोप दिला आहे. मुख्यमंत्र्याचा आणि इतरांचेही फोन आले असेही मोरे यांनी सांगितले आहे.