धोका वाढला ! देशात चारशेहून अधिकांना ओमायक्रॉनची बाधा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे.(Omicron News)

महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो.

दरम्यान महाराष्ट्र राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले असताना रुग्णवाढ सुरूच आह़े

राज्यात रविवारी करोनाचे १६४८ रुग्ण आढळले असून, आणखी ३१ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल़े दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमयक्राॅन व्हेरिएंट आतापर्यंत जगभरातील ३० देशांमध्ये पसरला आहे.

त्यामुळे संपूर्ण जगामध्ये ओमयक्राॅन किती धोकादायक ठरू शकतो यावर विचारमंथन सुरु झाले आहे. देशातील काही तज्ज्ञांनी दिलासादायक माहिती दिली आहे.