किरीट सोमय्यानंतर दरेकर पोलीस चौकशीच्या फेरीत; मुंबै बँक प्रकरणात पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबै बँक (Mumbai Bank) प्रकरणात पोलिसांनी (Police) पुन्हा एकदा नोटीस (Notice) बजावली असून त्यांना ११ एप्रिलला चौकशीला बोलावणही आले आहे.

प्रवीण दरेकर यांना ही दुसऱ्या वेळी नोटीस बजावण्यात आली असून याआधी पोलीस चौकशी वरून ते आक्रमक झाले होते, मात्र आता पुन्हा नोटीस आली असून यावर दरेकर काय प्रतिक्रिया देतील हे लवकरच समजणार आहे.

दरम्यान याआधी प्रवीण दरेकर म्हणाले होते की, मी चौकशीला जाणार, कर नाही त्याला डर कशाला? मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार, या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नाही, असे दरेकरांनी ठामपणे सांगितले होते.

तर दुसरीकडे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनाही कालच पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे भाजपचे दोन नेते आता पोलीस चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनात आक्रमक झाले होते. त्या वेळी ते म्हणाले होते, मला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न होत आहे.

पोलिसांचा राज्यात चुकीच्या मार्गाने वापर सुरू आहे. पोलिसांना भाजपच्या नेत्यांविरोधात वापरलं जातंय. असा थेट आरोप प्रवीण दरेकरांनी केला होता.