Diwali 2022 : पती-पत्नीचं पवित्र नातं जपणारा दिवस म्हणजे ‘दिवाळी पाडवा’, आजही कायम आहे ‘ही’ खास परंपरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali 2022 : साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असे दिवाळी पाडव्याचे वर्णन करतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा (Diwali Padwa) म्हणूनही साजरा केला जातो.

आजच्या दिवशी शुभकार्य करणे चांगले असते. या दिवशी तेलाच्या दिव्यांनी परिसर उजळून टाकतात.पती-पत्नीचं (Husband and Wife) पवित्र नातं जपणारा दिवस म्हणजे ‘दिवाळी पाडवा’ (Diwali in 2022) होय.

साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळीतील (Diwali) पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. व्यापाऱ्यांसाठी आर्थिक (Financial) हिशोबाच्या दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक नवीन वर्षाचा प्रारंभ करतात.

त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची मनोभावे पूजा केली जाते.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा त्याचबरोबर दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2022) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पाडाव्या दिवशी घर आणि कामाच्या ठिकाणी दारापुढे आकर्षक रांगोळी काढली जाते.

तेलाच्या दिव्यांनी परिसर आकर्षक रोषणाई केली जाते. कारण दिवाळीच्या सणात पाडव्याचे मुख्य आकर्षण असते. 24 ऑक्टोबरला यावर्षी दिवाळी पाडवा साजरा केला जाईल.

बलिप्रतिप्रदेची पूजा

बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तिन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावे यासाठी स्त्रिया भावाला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असे म्हणतात.

दिवाळी पाडव्याची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा

दिवाळी पाडव्याची एक परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. ती म्हणजे या दिवशी घरातील वडीलधाऱ्या आणि पतीला सकाळी तेल लावण्याची परंपरा आहे,त्याचबरोबर पाटाभोवती आकर्षक रांगोळी काढून वडीलधाऱ्या आणि पतीला ओवाळले जाते.

आपले वैवाहिक जीवन चांगले जाण्यासाठी आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी वाढण्यासाठी पत्नी आपल्या पतीला ओवाळते. एकंदरीतच पती-पत्नीचं पवित्र नातं जपणारा दिवस म्हणजे ‘दिवाळी पाडवा’.