Fatty Liver Disease : फॅटी लिव्हर? योग्य वेळीच लक्ष द्या, अन्यथा जाऊ शकतो प्राण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fatty Liver Disease : धावपळीचे जीवन (Running life) आणि चुकीचा आहारामुळे आरोग्याशी (Diet) निगडित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. फॅटी लिव्हर (Fatty Liver) हे त्यापैकी एक आहे. यकृत (Liver) पेशींमध्ये नको असलेली चरबी जमा झाल्याने ही समस्या येते. याचा यकृतावर खूप मोठा परिणाम होतो.

वेळीच यकृतातील वाढणाऱ्या चरबीकडे (Fat) लक्ष दिले नाही, तर त्याचे आरोग्यावर (Health) गंभीर परिणाम होतात. लवकरात लवकर या आजारावर उपचार केले तर निरोगी आयुष्य (Healthy Life) जगता येते.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे काय?

नॉन-अल्कोहोलिक (Non-alcoholic) फॅटी लिव्हर रोग जे लोक दारूचे सेवन करत नाहीत त्यांना होतो. या समस्येमध्ये व्यक्तीच्या आहारामुळे त्याच्या यकृतामध्ये अतिरिक्त चरबी किंवा चरबी जमा होते. त्यामुळे यकृत खराब होऊ लागते.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची लक्षणे –

ओटीपोटात सूज येणे, प्लीहा वाढणे, तळवे लाल होणे आणि डोळ्यांसह त्वचा पिवळी पडणे. ही सर्व नॉन-अल्कोहोलिक स्टीटोपेटाइटिसची लक्षणे आहेत.

कोलीन आणि यकृत यांच्यातील संबंध –

कोलीन शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. हे यकृतातील चरबी पचवण्याचे काम करते. यासोबतच फॅटी लिव्हर डिसीजचा धोका कमी करण्यातही खूप मदत होते.त्यामुळे फॅटी लिव्हर डिसीज टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोलीन असलेल्या गोष्टींचे सेवन करावे.

या गोष्टींमध्ये आढळते कोलीन –

अंडी –

अंडी हा कोलीनचा उत्तम स्रोत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश केला तर तुम्ही फॅटी लिव्हरची समस्या टाळू शकता.

सोयाबीन –

भाजलेल्या सोयाबीनच्या अर्ध्या वाटीत 107 मिलीग्राम कोलीन आढळते, जे तुमचे यकृत निरोगी ठेवण्याचे काम करते. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश करू शकता.