Free Calling App : डाउनलोड करा ‘हे’ अ‍ॅप, एकही रुपया खर्च न करता आयुष्यभर बोला मोफत; इंटरनेटही लागणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Calling App : देशात रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या खासगी टेलिकॉम कंपन्या तर बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या सर्वच कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी तसेच नवनवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात.

परंतु, या सर्वच कंपन्यांनी आपले सर्व रिचार्ज प्लॅन खूप महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अशातच तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण तुम्ही आता अ‍ॅपद्वारे आयुष्यभर विनामूल्य बोलू शकता.

जर तुम्हालाही पैसे आणि इंटरनेट खर्च न करता आयुष्यभर मोफत कॉल करायचे असल्यास तुमच्या स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तिथे तुम्हाला ब्लूटूथ वॉकी टॉकी नावाचे अ‍ॅप मिळेल. प्ले स्टोअरवरून ब्लूटूथ वॉकी टॉकी डाउनलोड करून तुमच्या फोनवर इन्स्टॉल करा.

आता हे अ‍ॅप उघडा. त्यानंतर आता तुम्हाला स्क्रीनवर वाय-फाय आणि रिफ्रेश बटण दिसून येईल. आता हे अ‍ॅप तुम्हाला ज्या मित्राशी बोलायचे आहे त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे. आता तुमच्या फोनवर अ‍ॅप उघडा आणि वाय-फाय आणि रिफ्रेश बटणावर क्लिक करावे लागणार आहे.

बटणावर क्लिक करताच, तुम्हाला जवळपासच्या सर्व ब्लूटूथ उपकरणांची सूची उपलब्ध होईल. त्यानंतर आता तुम्हाला ज्या मित्राशी बोलायचे आहे त्याच्या ब्लूटूथ डिव्हाइसवर टॅप करा. लगेच मित्राचा फोन टॅप करताच रिंग होईल.

रिंग वाजली की या ब्लूटूथ उपकरणाचा रंग लाल होतो तसेच कॉल आला की याचा रंग हिरवा होईल. इतकेच नाही तर तुमच्या सोयीसाठी अॅपमध्ये स्पीकरही दिले आहे. हे अ‍ॅप 100 मीटरच्या त्रिज्येत कार्य करेल, कारण ब्लूटूथची श्रेणी 100 मीटर इतकी आहे.