“बाळ” एवढ्या झटपट श्रीमंत झालाच कसा ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- नगर येथील रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे, याच्या अपसंपदेची उघड चौकशी करावी अशी मागणी राज्याचे आयकर विभागाचे आयुक्त यांच्याकडे येथील वकील सुरेश लगड यांनी निवेदनाद्वारे केली आहे नगर येथील यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात मुख्य सुत्रधार

म्हणून अहमदनगर येथील दैनिक सकाळ या वृत्तपत्राचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ जगन्नाथ बोठे यांस अहमदनगरच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक करून पोलिस कस्टडी रिमांड घेतली आहे.

या बोठेचे नाव पोलिस तपासात निष्पच होऊन जवळ पास 90 द्विवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही हा महाशय फरार झाल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. आता अथक प्रयासानंतर तो पोलिसांना सापडला

अशा परिस्थितीत त्याचे आर्थिक संपत्तीची आपल्या अधिपत्याखाली इन्कमटॅक्स खात्यामार्फत उघड चौकशी होणे आवश्यक झाले आहे. या मुख्य सूत्रधाराची समजलेली माहिती अशी की, याने अगदी सुरुवातीस प्रेस फोटोग्राफर म्हणून वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम केलेले होते. तदनंतर बातमीदार म्हणून काम केलेले होते,

त्यानंतर दैनिक सकाळ या वर्तमानत्रात सहाय्यक बातमीदार म्हणून, त्यानंतर मुख्य बातमीदार म्हणून, त्यानंतर निवासी संपादक व शेवटी कार्यकारी संपादक म्हणून दै. सकाळ अहमदनगर मध्ये काम केलेले आहे.

एक प्रेस फोटोग्राफर म्हणून सुरूवात केलेल्या या व्यक्तीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पत्रकारीता क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम केलेले आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हा वाळ झटपट (आर्थक दूट्या) इतका मोठा झाला की, विचारता सोय नाही.

या बाळ बोठेची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती काय होती व आताची आर्थिक परिस्थिती काय आहे ? याची सखोल चौकशी आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील.

त्याचे उत्पन्न व त्याच्याकडे असलेली ज्ञात, अज्ञात, जंगम मिळकत, केंश रक्कम याची बारकाईने चौकशी केली तर पत्रकारीता क्षेत्रातील ही व्यक्ती इतका झटपट श्रीमंत कशी होऊ शकते ?

व त्यास भरीव असे उत्पन्नाचे कोणते साधन होते की, एवढी प्रचंड माया गोळा करू शकला ? तसेच अनेक संस्थामध्ये स्लिपिंग पार्टनर, पुण्याच्या काही हॉस्पीटलमध्ये पार्टनर एल अॅण्ड टी क्लब सावेडी अहमदनगर जवळ 15 एकर क्षेत्र,

भिस्तबाग, अहमदनगर जवळ 7 एकरचा मोठा प्लॉट व भिंगार येथे 5 एकराची जागा अशी एवढी ज्ञात संपत्ती असल्याचे समजले व या व्यतिरिक्त काही अज्ञात संपत्ती असेल त्याची संपूर्ण चौकशी आपल्या अधिपत्याखाली इन्कमटॅक्स खात्याने करणे आवश्यक आहे.

पोलिसांनी त्याचे विविध बैंका व संस्थेवर आर्थिक व्यवहार करण्यास टाच आणलेली असताना त्यास त्याचे खात्यावरून पैसे काढता येत नाही त्यामुळे त्याच्याकडे खर्चासाठी फरार काळात दररोज जे पैसे होते ते आले कोठून ?

व त्याची ही वेहिशोबी मालमत्ता, कैश सर्त वावीची जनहितार्थ चौकशी झाली पाहिजे. कारण तीन महिने ही व्यक्ती फरार कशी राहू शकते ? स ध्या बोठे यास दै. सकाळ या वर्तमानपत्राचा पगार नाही मग त्यास पैसे आले कुठून ? या व्यक्तीने जो खर्च कुठून आणला ?

त्याचा मार्ग काय ? आता सकाळ वर्तमानपत्राचा त्याला पगार नाही मग त्यास पैसे आले केला तो कुठून ? पत्रकारीता क्षेत्रात अनेक पत्रकारांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काम केलेले आहे.

त्यातील काही पत्रकारांनी घरासाठी कर्ज घेतलेले त्या कर्जाचे हप्ते निटनेटके भरले गेलेले नाही आणि या वाळ बोठे महाशयाने इतकी उंच भरारी मारुन खूप माया कशाचे आधारे कमवली याचीही चौकशी जनहितार्थ होणे गरजेचे आहे.

सबब “बाळ जगनाथ वोठे याचा पत्रकारीतेतील प्रवास, त्याला तेथे मिळत असलेले उत्पन्न आणि त्याच्याकडे सध्या असलेली संपत्ती,

वेहिशोबी मालमत्ता याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याची बेहिशोबी मालमत्ता जप्त करावी तसेच अनेक संस्थामध्ये तो छुपा भागिदार ( स्लिपिंग पार्टनर) अल्याचे समजते. त्यावावत जनहितार्थ त्याची चौकशी करावी, असे वकील सुरेश लाड यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|