कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर, सेक्स करणे किती सुरक्षित ? वाचा महत्वाची माहिती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  कोरोनाला हरविण्यासाठी सध्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अमेरिका, रशिया, चीन, भारत यांनी विकसित केलेल्या लसी दिल्या जात आहेत.

नवनवीन लसींचे संशोधनही सुरू आहे. जितक्या जास्त लशी येतील तितकं जास्त वेगानं लसीकरण होऊ शकणार आहे. तसंच कोरोनाचा विषाणूही सतत आपली रूपं बदलत असल्यानं त्यावर प्रभावी ठरतील अशा लसींची आवश्यकताही आहेच.

कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर, सेक्स करणे किती सुरक्षित आहे, तसेच कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर किती दिवसांनी सेक्स करणे योग्य असू शकतं, याविषयी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी काही मतं मांडली आहेत.

अजून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी कोणतीही अधिकृत गाईडलाईन जारी केलेली नाही. पण आरोग्याशी संबंधित काही तज्ञांच्या मते पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतर काही दिवस सेक्स दरम्यान कंडोमसारख्या गोष्टींचा वापर केला पाहिजे.

सध्यातरी लसीकरण हाच या विषाणूवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, मात्र या लसीबाबतही अनेक समज, गैरसमज पसरत असतात. लस घेतल्यावर अनेकांना ताप येणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे असे अनेक त्रास होत असल्याचं आढळलं आहे.

तसेच लसीकरण झाल्यानंतर लैंगिक आयुष्यावर परिणाम होत असल्याच्या अफवाही काही समाज कंटक पसरवीत आहेत, मात्र कोरोना लसीचा लैंगिक आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.