आयडिया – वोडाफोनला अवघ्या 3 महिन्यात सात हजार कोटीहून अधिकचा तोटा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- वोडाफोन आणि आयडियाची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आली आहे. या कंपनीला चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत तब्बल ७३१९ कोटींचा प्रचंड तोटा झाला आहे. यामुळे देशभरातील जवळपास २७ कोटी ग्राहकांच्या अखंड सेवेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

कंपनी डबघाईला येण्याची काही कारणे…

मागील महिनाभरापासून वोडाफोन-आयडियाचे व्यवस्थापन भारतातून व्यवसाय गुंडाळण्याचा विचार करत आहे. कंपनीची तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी वोडाफोन-आयडियाचे भारताचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला

यांनी स्वतःकडील २७ टक्के हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विक्री करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्याला केंद्र सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे अखेर बिर्ला यांनी वोडाफोन-आयडियाच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे कंपनीच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली.

कंपनीची सेवा बंद झाली तर काय होणार ?:-  ग्राहक चिंतेत जूनअखेर वोडाफोन आयडियावर १.९१ लाख कोटींचे कर्ज आहे. दरम्यान, कंपनीची स्थिती ढासळत असल्याने देशभरातील २७ कोटी वोडाफोन-आयडिया युजर संकटात आहे. त्यातील १५ कोटी युजर टू-जी सेवा वापरणारे आहेत. कंपनीची सेवा बंद झाली तर काय होणार असा सवाल वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना सतावत आहे.