IMD Rain Alert : राज्यात पुढील ४ दिवस पावसाचे ! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Rain Alert : मध्यंतरी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस (Rain) सक्रिय झाला आहे. अनके जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. काही भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच खरीप हंगामातील (Kharip Crop) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यांच्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा हा जोर पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडेल. येथील प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

जम्मू, चंदीगड, दिल्ली, जोधपूर येथून मान्सून परतला आहे. मान्सूनच्या या माघारीमुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील आणि मुसळधार किंवा रिमझिम पाऊस पडेल.

नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबर रोजी नांदेड, परभणी, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 5 ऑक्टोबर रोजी परभणी, नांदेडसह विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईच्या हवामानाची स्थिती अशी असेल

मुंबईत आठवडाभर पाऊस पडत आहे. पावसासोबतच अनेक भागात सूर्यप्रकाशाची किरणेही दिसत आहेत. तापमानात फारशी वाढ झालेली नाही. मात्र पाऊस थांबल्याने आणि हवेतील आर्द्रता यामुळे उकाडा जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात फारसा फरक नाही.

मुंबईत पुढील आठवड्यात ५ ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. या वेळी ढग दाटून येऊ शकतात आणि रिमझिम पाऊस पडू शकतो. यामुळे, आर्द्रता देखील कायम राहू शकते. यानंतर म्हणजेच गुरुवारनंतर पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा महाराष्ट्रात किती पाऊस?

या वेळी महाराष्ट्रात 1 जिल्ह्यात जास्त पाऊस झाला. 18 जिल्ह्यांत जास्त पाऊस झाला. 17 जिल्हे असे होते की जेथे सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस झाला. एक जिल्हा असा होता की जिथे जास्त पाऊस पडला नाही. पण एकूणच यावेळी महाराष्ट्रात मान्सून दमदार होता. जोरदार पाऊस झाला.