शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! ‘या’ पद्धतीने करा नॅनो युरियाचा वापर; उत्पादनात हमखास होणार वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi news : मित्रांनो देशातील शेतकरी बांधवांच्या उत्पादनात (Farmers Income) भरीव वाढ व्हावी म्हणुन शासन तसेच देशातील वैज्ञानिक नेहमीच प्रयत्न करत असतात.

याचं क्रमात देशातील वैज्ञानिकानी नॅनो युरियाची (Nano Urea) निर्मिती केली आहे. इफको या देशातील नामांकित कंपनीने शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढवण्यासाठी विकसित केलेल्या नॅनो-लिक्विड युरियाचा व्यावसायिक वापर करणारा आपला भारत हा पहिला देश ठरला आहे.

कृषी क्षेत्रातील (Farming Sector) जाणकारांच्या मते, लिक्विड युरियामुळे पिकांसाठी आवश्यक उत्पादन खर्च कमी होतो, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते तसेच देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असल्याचा दावा केला जातो.

याचे हेच महत्त्व लक्षात घेऊन त्याचा वापर वाढवण्यासाठी सध्या सरकार शेतकऱ्यांना जागरूक करत आहे. आज आपण देखील नॅनो युरियाचा वापर कसा करावा याविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या लिक्विड स्वरूपातल्या नॅनो युरियाचा उपयोग शेतकरी त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता दीर्घकाळ अबाधित राखण्यासाठी करू शकतात.

खरं पाहता नॅनो युरिया हा नायट्रोजनचा स्रोत आहे आणि अल्पावधीतच पारंपरिक युरियाला एक शक्तिशाली पर्याय म्हणून उदयास आला आहे. मित्रांनो नॅनो युरिया लिक्विड असल्याने याच्या वापराने जमिनीचे आरोग्य अबाधित राहते. यामुळे उत्पादनात वाढ होते शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होते.

नॅनो युरियाचा वापर नेमका कसा करायचा
नॅनो युरिया वापरण्यापूर्वी त्याची बाटली नीट हलवा. नॅनो युरियाची एक बाटली 100-125 लिटर पाण्यात मिसळून द्रावण फवारणी यंत्रात भरून पिकावर फवारणी करावी. स्प्रे मशिनमध्ये 15 लिटर द्रावण तयार करून फवारणी करावी.

नॅनो लिक्विड युरियाची पहिली फवारणी उगवण/प्रत्यारोपणाच्या 30-35 दिवसांनी, दुसरी फवारणी फुलोऱ्यापूर्वी करावी. कडधान्य पिकांवर एकदा आणि उरलेल्या पिकांवर दोनदा फवारणी करावी लागेल, परंतु पेरणीच्या वेळी त्याचा वापर होत नाही. नॅनो युरिया लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर आणि थंड व कोरड्या जागी साठवून ठेवावे.

निश्चितच नॅनो युरियाच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमात देखील बचत होणार आहे. एकंदरीत नॅनो युरिया शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणार आहे.

नॅनो युरिया सामान्य युरियापेक्षा जास्त प्रभावी असल्याचा दावा केला जातं आहे. यामुळे खत टंचाईसारखा मुद्दा देखील काळाआड जाणार आहे. एक नॅनो युरिया शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीवर रामबाण उपाय ठरणार आहे.