‘त्या’ पदावर जाण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याला पंधरा विस वर्षे लागतात मात्र संघाची हापचड्डी घालणारा थेट जाऊन बसतो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News: वंचित समाजाला दिशा देण्याचे कार्य संत भगवानबाबांनी केले. भगवानबाबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार उलथुन टाकण्याचे काम आता जनताच करेल.

आयएएस अधिकाऱ्याला ज्या पदावर जाण्यासाठी पंधरा विस वर्षे लागतता. त्या पदावर संघाची हापचड्डी घालणारा थेट जाऊन बसतो हे संविधानाला घातक आहे. थेट प्रशसान बदलण्याचा भाजपाचा डाव आहे. अशी अत्यंत कडवी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

बीड येथील ओबीसी

परीषदेला जाण्यापुर्वी पटोले यांनी संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारचवर सडकून टीका केली. पुढे ते म्हणाले की,शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, व्यापारी यांच्या विरोधातील हे सरकार आहे.

सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात गेली आहे. विरोधातील लोकांनी ईडीची भिती दाखवुन हे संविधानाला बदलण्याचा प्रयत्न करणारे आहेत. आम्ही सामान्य माणसाला न्याय देण्याची भुमिका घेवुन राज्यभर दौरा करतोय.

जनतेने लायकी नसलेली लोक सत्तेत नेहुन ठेवली आहेत. त्यांची चुक त्यांना आता समजली आहे. येणाऱ्या काळात जनता राज्य व केंद्रातील सरकराला खाली खेचेल. राज्यात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अवस्था वाईट आहे.

त्यामुळे रोज अपघात होत आहेत. जीव जात आहेत. नाशिकचा अपघात केवळ खड्डयामुळे झालाय. भ्रष्टाचारी सरकार जनताच ठिकाण्यावर आणेल. दिल्लीतील अत्याचारी व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आमचा लढा सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री नागपुरात येवुन सांगतात मी मोदी व शहांचा हस्तक आहे. आम्ही जनेतेचे हस्तक आहोत. असेही ते म्हणाले.