Jio Vs Airtel Vs VI: कोणत्या टेलिकॉम कंपनीचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी आहे बेस्ट ; जाणून घ्या एका क्लीकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Vs Airtel Vs VI:  जेव्हापासून दूरसंचार ऑपरेटर्स Airtel, Jio आणि Vodafone-Idea ने त्यांचे दर वाढवले आहेत.  वापरकर्ते (Users) सतत नवीन आणि परवडणाऱ्या योजनांच्या शोधात असतात. 

टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे प्रीपेड प्लॅनच (prepaid plans) महागले नाहीत  उलट, या योजनांचे स्ट्रीमिंग फायदे देखील मोठ्या प्रमाणात कमी केले गेले आहेत.

आता Airtel, Jio आणि Vodafone Idea 666 रुपयांच्या रेंजमधील मिड-रेंज प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहेत. Airtel आणि Vi त्यांच्या 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह 77 दिवसांची वैधता देत आहेत. तर Jio आपल्या प्लॅनसह 84 दिवसांची वैधता ऑफर करत आहे.

त्या वापरकर्त्यांसाठी या योजना उपयोगी पडतील जे डेटा आणि कॉलिंग फायद्यांसह दोन महिन्यांपेक्षा जास्त वैधतेसह योजना शोधत आहेत.

गेल्या आठवड्यात Vodafone Idea ने Rs 700 अंतर्गत चार नवीन प्रीपेड योजना सादर केल्या. या प्रीपेड प्लॅनची किंमत रु. 155, रु. 239, रु. 666 आणि रु. 699 आहे. हे प्लॅन सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. आणि VI वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

Vodafone Idea Rs 666 prepaid plan

Vodafone-Idea चा हा प्रीपेड प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉल्स, दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 मेसेज ऑफर करतो. या प्लॅनमध्ये 77 दिवसांच्या वैधतेसह Vi movies आणि टीव्ही देखील देते.

या प्लॅनमध्ये तुम्हाला Binge All Night Benefits, Weekend Data Rollover Benefits आणि Data Delights ऑफरची सुविधा देखील मिळेल.

Airtel Prepaid Plan

Airtel ने आता असा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. जे 77 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS प्रति दिन ऑफर करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम व्हिडिओ मोबाइल व्हर्जन Apollo 24X7 ची सुविधा देखील मिळेल.

airtel(1)

शॉ अॅकॅडमीसह मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम, FASTag वर रु. 100 कॅशबॅक, मोफत हॅलो ट्यून आणि विंक म्युझिक ऑफरचा लाभ घेता येईल.

Reliance Jio prepaid plan

Jio phone 5G(2)

जिओ 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज अमर्यादित कॉल्ससह 1.5GB डेटा आणि 100 SMS मिळतील. या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा प्रवेश उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे जिओच्या या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे.