करुणा मुंडे यांची निवडणूकीबाबत मोठी घोषणा; काय म्हणाल्या करुणा मुंडे वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- गेल्या महिन्यात शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची घोषणा नगरमध्ये करुणा शर्मा-मुंडे यांनी केली होती. आज महाराष्ट्रात या दौऱ्याची सुरुवात त्यांनी संगमनेर मधून केली आहे,

यावेळी करुणा मुंडे यांनी त्यांच्या भूमिकेत बदल करत म्हणाल्या की, आपण कोणतीच निवडणूक लढणार नाही तसेच आपल्या मुलालाही आपण राजकारणात आणणार नाही, पण भविष्यात मुलाची इच्छा असेल तर मी त्याला अडविणार नाही.

नगरमध्ये पक्षाची घोषणा करताना करुणा शर्मा-मुंडे यांनी वेळ पडल्यास आपले पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

करुणा मुंडे यांनी गेल्या महिन्यात नगरमध्ये शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची घोषणा केली होती. तसेच ३० जानेवारी २०२२ रोजी नगरमध्ये मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

गरज पडल्यास बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे यांच्या विरोधातही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. अनेक अदृश्य शक्ती माझ्या मागे आहेत आणि हा भ्रष्टाचार व आपल्याला अत्याचारमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे.

त्यासाठी राज्यात अनेक निर्भीड लोक आहेत, तरीपण मी एकटीच निघाले आहे. राज्यातील निर्भीड हिरोंचा शोध घेत मी दौरा सुरू केला आहे.

असे असले तरी दबावाचे राजकारण सुरू असल्याचा दावा मुंढे यांनी केला आहे.तसेच मी परखडपणे विचार मांडते म्हणून माझे सोशल मीडिया अकाऊंट निलंबित करण्यात आले.

त्यातून मी ४० लाख लोकांपर्यंत पोहोचत होते. मात्र , माझ्यासारख्या महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर इतरांची काय अवस्था असेल? हे सर्व थांबविण्यासाठी लढा देण्याची गरज आहे.

पैसा आणि स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणारी ही प्रवृत्ती वाढली आहे.

ती दूर करण्यासाठी आपण नव्या पक्षाची स्थापना करत आहोत अशे बोलत त्यांनी सध्याच्या राजकारणावर आरोप केले व सध्याच्या राजकारणात नैतिकता उरली नाही असेही म्हणाल्या.

आज संगमनेरचा पहिलाचा दौरा होता. अशाच पद्धतीने राज्यभर फिरून नव्या पक्षाला पांठिबा मिळविणार आहे, असेही त्या म्हणाल्या