LPG Cylinder : अडीच वर्षात सिलिंडरच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, पुन्हा वाढणार किमती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Cylinder : देशातील जनता सध्या महागाईच्या चटक्यांमुळे (Inflation)चोहोबाजूने होरपळून निघत आहे. पेट्रोल आणि डिझेलसह (Petrol and Diesel) सिलिंडरच्या किमतीतही दरवाढ सुरूच आहे.

मागील अडीच वर्षात सिलिंडर (LPG Cylinder Price) 41 टक्क्यांनी महाग झाला आहे. सिलिंडरच्या किमती या जागतिक बाजारात (Global market) 3 पटीने वाढल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत एलपीजी गॅसच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. सध्या दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर गेली आहे. एप्रिल 2020 पासून आत्तापर्यंत पाहिले तर LPG गॅस सिलेंडर सुमारे 41 टक्क्यांनी महाग झाला आहे.

ही किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु जागतिक बाजाराच्या तुलनेत ही वाढ खूपच कमी आहे. जागतिक बाजारात किमती 3 पटीने वाढल्या आहेत.

जागतिक बाजारपेठेत एलपीजी किती महाग झाला

सरकारने (Government) राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2020 ते जुलै 2022 पर्यंत, म्हणजे सुमारे अडीच वर्षात, जागतिक बाजारपेठेत किंमत प्रति टन $ 236 वरून $ 725 प्रति टन झाली आहे. यावरून जागतिक बाजारपेठेत एलपीजीच्या किमतीत 203 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.

त्याच वेळी, एप्रिल 2020 पासून भारतात घरगुती गॅस सिलेंडरची (14.2 किलो) किंमत 309 रुपयांनी वाढली आहे. ही किंमत 744 रुपये प्रति सिलेंडरवरून 1053 रुपये झाली आहे.

या 6 देशांच्या तुलनेत भारतात अजूनही गॅस सिलिंडर स्वस्त आहे

हरदीप सिंह पुरी यांनी काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये सांगितले होते की, भारतात (India) गॅस सिलिंडर किती मिळत आहे. यावरून भारतातील गॅस सिलिंडर अजूनही 6 देशांपेक्षा स्वस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, शेजारी देश पाकिस्तानमध्ये सिलिंडर 1113.73 रुपयांना, श्रीलंकेत 1243.32 रुपयांना आणि नेपाळमध्ये 1139.93 रुपयांना मिळत आहे.

एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियात गॅस सिलेंडर 1764.67 रुपये, अमेरिकेत 1754.67 रुपये आणि कॅनडामध्ये 2411.20 रुपये आहे.

https://twitter.com/HardeepSPuri/status/1551584539687862273?s=20&t=bwRBPJG9GZYzEqv38gTLaQ

मोदी सरकारच्या कार्यकाळात सिलेंडर किती महाग झाले

इंडियन ऑइलचे गेल्या काही महिन्यांतील किंवा वर्षभरातील आकडे पाहता गॅस सिलिंडरच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. दुसरीकडे, 2014 पासून म्हणजेच मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनची आकडेवारी पाहिली, तर तुम्हाला कळेल की, दरात फारशी वाढ झालेली नाही.

आज सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे, तर मे 2014 मध्ये गॅस सिलेंडरची किंमत 928.5 रुपये होती. त्यामुळे गेल्या 8 वर्षांत गॅस सिलिंडर केवळ 124.5 रुपयांनी महागला आहे का?

सबसिडी… जी संपुष्टात आली आहे

सुमारे 3 वर्षांपूर्वी तुम्ही गॅस सिलिंडर खरेदी करायचो तेव्हा त्यावर तुम्हाला सुमारे 400 रुपये सबसिडी मिळायची. ही सबसिडी हळूहळू कमी करून एक दिवस संपली.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, पेट्रोलियम मंत्रालयानेच एका ट्विटमध्ये म्हटले होते की, मे 2020 पासून अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही फरक नाही, त्यामुळे ग्राहकांना सबसिडी दिली जात नाही.

ऑइल सेक्रेटरी पंकज जैन यांनीही न्यूज ब्रीफिंगमध्ये सांगितले आहे की, जून 2020 पासून गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्यात आली आहे.

म्हणजेच 8 वर्षात गॅस सिलिंडर केवळ 124.5 रुपयांनी महागला नाही, तर 400 रुपयांहून अधिकची सबसिडीही संपली आणि ही गॅसच्या किमतीत झालेली वाढ मानली पाहिजे.