ढाकणेंचे आव्हान परतून लावण्यासाठी आमदार राजळेंना हवी पंकजा मुंडेंची साथ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजपच्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे या नाराज नसल्याचे त्याने जाहीर केले.

आता आगामी निवडणूक पाहता शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना आगामी निवडणुकांसाठी पंकजा मुंडेंच्या मदतीची गरज भासू शकते. यामुळे आता पक्ष बळकटीकरणासाठी राज्यातील बडे नेतेमंडळी दौरे करू लागले आहे.

पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या आमदार आहेत. भाजपमध्ये दोन गट सक्रिय आहेत. त्यातील काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नुकतीच पदाधिकाऱ्यांच्या काही निवडी जाहीर करून भाजपने राजळे यांच्या विरुद्धची लढाई सुरू केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राजळे यांना मुंडे यांनी ताकद दिली.

पाथर्डी-शेवगावमध्ये भाजपची भीस्त मुंडे यांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. आता राजळे यांच्यापुढे अॅड. ढाकणे यांचे आव्हान आहे. ते परतविण्यासाठी मुंडे यांची साथ राजळे यांना आवश्यक आहे.

मुंडे जरी पक्षावर नाराज असल्या, तरी राजळे यांच्यासाठी तरी त्यांना ताकद उभी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंडे यांच्या भूमिकेवरच पाथर्डी-शेवगावमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील पक्ष अशी लढत आगामी ग्रामपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकीतून दिसून येणार आहे.