7th Pay Commission: 2 लाख नाही, आता सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकते इतकी रक्कम, लवकरच होणार घोषणा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Central Staff) दीर्घकाळापासून सरकारकडे त्यांचा थकित डीए (DA) देण्याची मागणी करत आहेत. लाखो कर्मचार्‍यांचा थकित डीए सरकार पुढील महिन्यात भरू शकते, असे वृत्त आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत DA रोखून ठेवण्याची मागणी कर्मचारी सातत्याने करत आहेत. बातम्यांनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकरकमी 1.50 लाख रुपये टाकण्याच्या योजनेवर काम करत आहे.

यापूर्वी दोन लाख रुपयांपर्यंतची डीएची थकबाकी सरकार भरू शकते, असे सांगितले जात होते. यासोबतच सरकार जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचीही घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे.

18 महिन्यांची थकबाकी –

कोविडमुळे सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा 18 महिन्यांचा डीए होल्ड केला होता. सरकार (Government) लवकरच त्यांची थकबाकी काढेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. तसेच आतापर्यंत थकबाकी डीएची भरपाई आणि वाढ याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान नाही.

सरकार आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकावेळी दीड लाख रुपये टाकू शकते, असे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बँडनुसार डीए थकबाकीचे पैसे मिळतील.

बैठक होणार आहे –

वित्त मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (Department of Personnel and Training) आणि खर्च विभाग (Expenditure Department) च्या अधिकाऱ्यांची संयुक्त सल्लागार यंत्रणा (Joint Advisory System) ची बैठक होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी एकरकमी भरण्याबाबत चर्चा होऊ शकते.

यासोबतच डीएमध्ये वाढ करण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के दराने डीए दिला जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार जुलैमध्ये डीए 4 ते 5 टक्क्यांनी वाढवू शकते असे बोलले जात आहे.

DA वाढू शकतो –

महागाईचे आकडे लक्षात घेऊन सरकारने जुलैमध्ये डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे.

कर्मचाऱ्यांच्या राहणीमानावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून सरकार महागाईनुसार डीए वाढवते. या वर्षी मार्च महिन्यात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती.