Audio Clip: अधिकारी व ठेकेदाराचा ‘तो’ ऑडिओ क्लिप व्हायरल; विद्यापीठ परिसरात खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर –  अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयात असणाऱ्या राहुरी विद्यापीठमधील (Rahuri University) एका अधिकारीक आणि ठेकेदाराचा (Official and Contractor) ऑडिओ किल्प (Audio clip) व्हायरल (Viral) झाला आहे.

या ऑडिओ किल्पमध्ये अभियंता ठेकेदारास पन्नास हजार रुपयांची मागणी कारणात दिसून येत आहे. त्यामुळे राहुरी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या हा ऑडिओ किल्प मोठ्या प्रमाणाने विद्यापीठ परिसरात व्हायरल होत आहे तसेच परिसरात आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  तो अधिकारी आणि ठेकेदार कोण याबाबत अनेक तर्क लावण्यात येत आहे. 

पन्नास हजार रुपयाची मागणी

या क्लिपमधील अभियंता ठेकेदारास पन्नास हजार रुपयाची मागणी करताना दिसून येत आहे, तसेच यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांची चर्चा करतांनाचा संवाद ऐकू येत आहे. हे पन्नास हजार हळूहळू येणाऱ्या फाईलमध्ये ऍडजस्ट करू असेही यात उल्लेख आहे.

या क्लिपमुळे विद्यापीठ अभियंता कार्यालयात सुरू असलेला काळाबाजार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आता या क्लिपचे पुढे काय होणार ? विद्यापीठाचे विद्यापीठ अभियंता, कुलसचिव व कुलगुरू यावर काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या प्रकरणात कुलगुरू काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.