OnePlus TV : अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार वन प्लसचा नवा टीव्ही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus TV : OnePlus Nord 2T 5G या स्मार्टफोननंतर (Smartphone) आता OnePlus TV 50 Y1S Pro बाजारपेठेत (Market) दाखल करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे(OnePlus TV). मागील आठवड्यात कंपनीने याबद्दल माहिती दिली होती.

येत्या 4 जुलै रोजी हा टीव्ही भारतात (India) लाँच होणार आहे. यामध्ये OnePlus TV 43 Y1S Pro सारखेच गामा इंजिन दिले आहे. त्याचबरोबर MEMC तंत्रज्ञानासोबतच 4K UHD डिस्प्ले दिला आहे.

जारी केलेल्या टीझरनुसार, OnePlus TV 50 Y1S Pro मध्ये 50-इंचाचा 4K UHD डिस्प्ले असेल. रिअल टाइममध्ये इमेजची गुणवत्ता वाढवण्यासाठी यात गामा इंजिन देखील असेल. याशिवाय या टीव्हीमध्ये MEMC सपोर्ट, HDR 10 सपोर्ट आणि डॉल्बी ऑडिओ यांसारखे अनेक फीचर्सही उपलब्ध असतील.

याआधीच्या Y मालिकेतील स्मार्ट टीव्ही मॉडेल्सप्रमाणेच यालाही स्मार्ट मॅनेजर मिळेल. याच्या मदतीने सिस्टम (System), स्पीड, स्टोरेज (Storage), आणि स्पेस यासारख्या अनेक फंक्शन्स नियंत्रित करता येतात. एवढेच नाही तर OnePlus TV 50 Y1S Pro ला डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 24W स्पीकर देखील मिळतील. हा नवीन स्मार्ट टीव्ही OnePlus डिव्हाइसेससह कनेक्टिव्हिटी देखील देईल.

वनप्लस वॉचद्वारे वापरकर्ते टीव्हीचा आवाज समायोजित करण्यास सक्षम असतील. यासोबतच स्लीप डिटेक्शन फीचरसह टीव्ही देखील बंद होईल. हा टीव्ही 8GB स्टोरेजसह येईल असे लिस्टिंगवरून समोर आले आहे.