Onion Price: विविध कारणाने कांद्याच्या भावात चढ-उतार झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नुकसानीबरोबर संभ्रम कायम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Price:  नाशिक, लासलगाव(Lasalgaon) मध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत. अवघ्या आठ दिवसांत कांद्याचे भाव इतके घसरल्याने आता भविष्याची चिंता सतावत असल्याचे शेतकऱ्यांनी(Farmers) सांगितले. महिनाभरापासून स्थिर असलेले कांद्याचे भाव अचानक बदलल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या मनात नुकसानीबद्दल चिंता वाढू लागली आहे. (maharashtra mandi)

केवळ लाल कांदाच नाही तर उन्हाळ कांद्याचाही(Summer onions) शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता. मात्र आता लाल कांद्याचे भाव आठ दिवसांत ७६४ रुपयांनी तर उन्हाळ कांद्याचे भाव ६३० रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरी व्यापारी यांचे गणिते बिघडली आहेत.

ही यामागची कारणे
सध्या देशात कांद्याची काढणी चालू आहे. देशातील एकूण मागणीपेक्षा सध्या बाजारात कांद्याची आवक जास्त झाली आहे. दुसरे कारण म्हणजे सध्या युक्रेन आणि रशिया युद्धामुळे कांद्याच्या निर्यातीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अचानक झालेल्या भावात कांदा उत्पादकांचे 11 कोटी 72 लाखांचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वाढत्या उष्णतेमुळे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि देशातील इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात लाल कांदा मंडईत पोहोचत आहे. तसेच उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढल्याने मागणीपेक्षा देशांतर्गत पुरवठा अधिक आहे. गेल्या आठवड्यात लाल कांद्याचा कमाल भाव 2,625 रुपये होता.

मात्र शनिवारी, 5 मार्च रोजी लाल कांद्याचा भाव 1,861 रुपयांवर आला. उन्हाळी हंगामातील नवीन कांद्याला गेल्या आठवड्यात 2430 रुपयांपासून भाव मिळत होता, मात्र आठ दिवसांतच कांद्याचे भाव गडगडले. 5 मार्च रोजी उन्हाळी लाल कांद्याला 1800 रुपये भाव मिळत आहे.

कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लासलगाव बाजार समितीत गेल्या आठ दिवसांत 1 लाख 41 हजार 969 क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी बाजारात आला होता, मात्र भावात 764 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातील नवीन लाल कांद्याचा भाव 2552 रुपये प्रतिक्विंटल झाला असून, त्यात 630 रुपयांची घसरण झाली आहे.

लासलगावसह नाशिक जिल्ह्यात 17 कांदा बाजार समित्या आहेत. कांद्याच्या भावात घसरण झाल्याने सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे.

उन्हाळी कांदा आणि युद्ध
नव्याने आलेल्या उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून, त्यामुळे भावात घसरण होताना दिसत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचे कांद्याबाबत निर्यातीचे धोरण स्पष्ट नाही. सध्या निर्यातील युद्धाचा अडसर असल्याचे बोलले जात आहे. कांद्याच्या निर्यातीबाबत सरकारने स्पष्ट धोरण ठरवावे अशी मागणी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे.