Oppo Smartphone Offer : सर्वच निर्मात्या कंपन्या आपले 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत. 5G फोन असल्याने त्यांच्या किमती जास्त आहेत. जर तुम्हाला कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे.
भारतीय बाजारात Oppo ने आपला नवीन 5G स्मार्टफोन Oppo A79 5G लॉन्च केला आहे. अनेक दिवसांपासून या फोनची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. 20 हजारांपेक्षा कमी या फोनची किंमत कंपनीने ठेवली आहे.
मजबूत बिल्ड शिवाय, हा फोन IP54 रेटिंग ऑफर करतो. कंपनीच्या मतानुसार हा फोन 320 गुणवत्ता चाचण्यांसह 130 अत्यंत विश्वासार्हता चाचण्यांमधून उत्तीर्ण झाले आहे. या चाचण्यांत ड्रॉप, अँटी-स्प्लॅश, रेडिएशन, हवामान, तापमान संरक्षण, आग आणि सिग्नल चाचण्या उपलब्ध आहे.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर Oppo ने नवीन फोनची किंमत 19,999 रुपये आहे, त्याची विक्री 28 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने Oppo A79 5G दोन रंग पर्यायांत आणला आहे. Glowing Green आणि Mystery Black. तुम्ही तो Oppo Store, Flipkart किंवा Amazon वरून खरेदी करू शकता.
समजा तुम्ही आयसीआयसीआय बँक, एसबीआय कार्ड्स, कोटक बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड, एयू फायनान्स बँक आणि वन कार्डद्वारे पेमेंट केले तर 4000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. कंपनी Oppo ग्राहकांना जुन्या फोनच्या बदल्यात 4000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ देईल. ग्राहकांना हवे असेल तर ते नवीन फोन विनाखर्च EMI वर विकत घेऊ शकतात.
जाणून घ्या खासियत
Oppo च्या या फोनमध्ये पंच-होल कॅमेरासह 6.72 इंचाचा फुल एचडी सनलाइट डिस्प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश दर देत असून तो उच्च-गुणवत्तेच्या स्ट्रीमिंगसाठी फोनमध्ये Wideone L1 समर्थित आहे. या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरासह सेटअप दिला आहे.
स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये MediaTek 6020 प्रोसेसर आहे आणि 128GB स्टोरेज मिळेल. Android 13 वर आधारित ColorOS 13 उपलब्ध असून याच्या 5000mAh बॅटरीला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.