Pan Card Alert : पॅनकार्ड चोरीला गेल्यास लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा अडचणीत याल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan Card Alert : महत्वाच्या कागदपत्रांपैकी पॅनकार्ड (Pan Card) हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. पॅनकार्डची गरज ही बँकिंग (Banking) कामात जास्त पडते.

पॅनकार्डशिवाय बरीचशी बँकिंग कामे रखडून पडतात. जर तुमचे पॅनकार्ड चोरीला (Pan card theft) गेल्यास लगेच काही पावले उचलणे गरजेचे आहे.

हे प्रथम करा

जर तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले असेल तर तुम्ही त्याची तक्रार पॅनकार्ड कार्यालयात (Pan Card Office) करा. याशिवाय, तुम्ही FIR देखील करून घ्या.

जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये. यानंतर तुम्हाला तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड (Duplicate Pan Card) बनवता येईल.

पॅन कार्ड पुन्हा बनवण्याचा मार्ग येथे आहे:-

स्टेप 1 
जर तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले असेल तर तुम्ही ते पुन्हा प्रिंट करून घ्या. जेणेकरून तुमचे कोणतेही काम थांबणार नाही. यासाठी तुम्हाला https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल.

स्टेप 2

आता तुम्हाला येथे एक फॉर्म (Pan Card Form) भरावा लागेल आणि तुमचा चोरीला गेलेला पॅन क्रमांक टाकावा लागेल. याशिवाय आधार क्रमांक सारखी इतर माहिती टाका.

स्टेप 3

त्यानंतर तुमच्या आधार कार्डला संमती द्या आणि कॅप्चा कोड भरा. नंतर सबमिट करा. आता तुम्हाला शुल्क भरण्यासाठी https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homereprint या लिंकवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 4

माहितीनुसार, देशात तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला 50 रुपये आणि देशाबाहेर मागण्यासाठी 959 रुपये द्यावे लागतील. पेमेंट केल्यानंतर, तुमचे नवीन पॅन कार्ड तुमच्या घरी येते.