“कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत, हिमालयात कोण जाते ते पाहुयात”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नाशिक : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीत (By-Election) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) विजयी ठरल्या आहेत. तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajit Kadam) हे पराभूत झाले आहेत. त्यानंतर महाविकास आघडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, काही लोक हनुमान चालिसा म्हणायला पुण्याला पोहचले आहेत. मात्र, भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. कोल्हापुरात प्रचार शिगेला पोहोचला असतानाच काहींनी भोंगे,

हनुमान चालिसा असे घाणेरडे राजकारण सुरू करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे भोंगे उतरवण्याचे काम कोल्हापूरकरांनी केले आहे. हेच महाराष्ट्राचे जनमत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना शेवटच्या फेरीअखेर एकूण 18901 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप नेते सत्यजित कदम यांना 18901 मतांनी धूळ चारली आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत. त्यामुळे आता हिमालयात कोण जाते ते पाहुयात. विले-पार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाची सुरुवात केली.

भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही. भोंग्यामागचे आवाज कोणाचे हे साऱ्यांना माहित आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलेले आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

रामनवमीला 10 राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी निवडणूक तिथे दंगली घडवायच्या होत्या. हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर संपला.

पण महाराष्ट्रात सत्ता येत नाही म्हणून भाजप निराशेने ग्रासला आहे. त्यांचे इथे नव हिंदू ओवेसेमार्फत दंगली घडवण्याचे कारस्थान आहे.

त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.