farming business ideas : उन्हाळी भेंडी लागवड करा; मिळवा भरघोस नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Vegetable Farming:- शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नुसते भाजीपाला शेती करणे देखील फायदेशीर असते. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करून अधिकचा नफा मिळवता येऊ शकतो.

शेतकरी भेंडी शेतीतून कमीत कमी खर्चात अधिकचा नफा कसा मिळू शकतो. व त्याची लागवड नियोजन कशा पद्धतीने केली जाते.या बद्दल आपण आज जाणून घेवू

भेंडी लागवडी साठी जमीन

भेंडीची लागवड करण्याआधी आपल्याला शेतजमीन आधी तयार करून घ्यावी लागणार आहे. भेंडी ची लागवड उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात देखील केली जाते.पण उन्हाळ्यात लागवड केलेल्या भेंडीचे उत्पादन हे सर्वाधिक निघते.

भेंडी लागवडीसाठी सुपीक जमिनीची गरज असते. त्यासाठी जमिनीचा पी एच मूल्य 7.0 ते 7.8 असणे योग्य आहे. जमिनीची दोन-तीन वेळा नांगरणी करून घ्यावी. नंतर जमीन ही मऊ करुन समतल करून घ्यावी.

भेंडी लागवडीसाठी योग्य वेळ

भेंडी लागवड करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत भेंडीची लागवड केली जाऊ शकते.

भेंडी लागवड कशी करावी

भेंडी लागवड करण्याच्या आधी काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी एका ओळीतून दुसऱ्या ओळीतील अंतर हे कमीत कमी 40 ते 45 सेंटिमीटर असणे गरजेचे आहे. त्यामुळे हवा खेळती राहून भेंडी वाढण्यास मदत होते.

सिंचित स्थिती 2.5 ते 3 किलोग्राम आणि असिंचित स्थिती 5 ते 7 किलोग्राम प्रति हेक्टरी बीयाने लागते. तर भेंडी चे बीयाने हे शेतात लावतात सरळ लागवड करून घ्यावी ते 3 सेंटीमीटर च्या खाली गेले नाही पाहिजे. भेंडीचे बियाणे लागवड करण्याच्या आधी बियाण्यांची योग्य प्रकारे बिजारोपण करून घ्यावे. बीजारोपणा मुळे भेंडीचे पिक रोगास बळी पडत नाही.

भेंडी लागवडीतील प्रमुख राज्य

भेंडी लागवड ही प्रामुख्याने झारखंड, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तरप्रदेश, असम, महाराष्ट्र इत्यादी ठिकानी केली जाते. शिवाय हरियाणा आणि राजस्थान मध्ये देखील भेंडी ची लागवड केली जात आहे.

भेंडी पिकास उपयुक्त खते

भेंडी पिकाचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी प्रति हेक्‍टरी क्षेत्रामध्ये जवळपास 15 ते 20 टन शेणखत आणि नत्र आणि स्फुर आणि पोटॅश याची 80 किग्रा किंवा ६० किग्रा. प्रति हेक्टरी शेतात टाकणे गरजेचे आसते.

भेंडी पिकाचे व्यवस्थापन

भेंडी पिकासाठी वेळेनुसार खत,औषध फवारणी करणे गरजेचे असते. लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी कीडनियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जाऊ शकतो.

सिंचन भेंडीची लागवड मार्च महिन्या अखेरीस केल्यास दहा-दिवसांनी पाणी द्यावे नंतर वाढत्या उन्हामुळे एप्रिल महिन्यात सात किंवा आठ दिवसानंतर भेंडी पिकास पाण्याची गरज असते. तर जून महिन्यात चार ते पाच दिवसानंतर पाणी देणे भेंडी पिकास गरजेचे असते.

भेंडी पिकांच्या संकरित जाती

पूसा ए- 4

परभणी क्रांति

पंजाब-7

अर्का अभय

अर्का अनामिका

वर्षा उपहार

अत्याधुनिक

वी.आर.ओ. 6

भिंडी आरोग्यासाठी लाभदायक आहे 

भेंडी ची भाजी ही आरोग्या साठी फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील अनेक रोग दूर राहतात. भेंडी हृदयातील विकार दूर करते तर डायबिटीज चा रुग्णांना भेंडी खाण्याचा मोठा फायदा आहे. याशिवाय अनमिया
रोगासाठी भेंडी लाभकारी आहे.

उत्पन्न

भेंडीची मागणीही प्रत्येक बाजारात असते तर
योग्य पद्धतीने भेंडीची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळून पाच लाख रुपयांचा नफा शेतकऱ्याला मिळू शकतो.