PM Kusum Yojana : केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत आहे सौरऊर्जेवर चालणारे पंप; असा घ्या या योजनेचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kusum Yojana : केंद्र सरकार (Central Goverment) सतत शेतकऱ्यांसाठी (Farmer) विविध योजना घेऊन येत असते. या योजनांचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत असतो. शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकार सौरऊर्जेवर चालणारे पंप (Solar energy pump) या योजने अंतर्गत देत आहे.

तुम्हाला भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. प्रधानमंत्री कुसुम योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जेवर चालणारे सौरपंप बसविण्यात येत आहेत.

पंतप्रधान कुसुम योजना भारत सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेचे पूर्ण नाव प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाभियान योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप (Solar pump) बसवण्यासाठी ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे.

देशात असे अनेक शेतकरी आहेत जे आजही डिझेल इंजिनने शेतात पाणी देतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इंधन खरेदीवर खर्च होतो.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना डिझेलशिवाय सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा प्रधानमंत्री कुसुम योजनेचा उद्देश आहे. चला जाणून घेऊया कुसुम योजनेच्या खास गोष्टी –

प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना सौर पंप किंवा कूपनलिका बसवण्यासाठी 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज देत आहे. या योजनेचा उद्देश देशात अक्षय ऊर्जेला चालना देणे हा आहे.

कुसुम योजनेत चार घटक असतात. यामध्ये शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप, सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, कूपनलिका बांधणे आणि सध्याच्या पंपांचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात सौरपंप उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. पीएम कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

तुम्हालाही प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, नोंदणीची प्रत, अधिकृततेची प्रत, जमीन जमाबंदीची प्रत, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील इत्यादी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असेल.