Post Office : 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा बंपर परतावा, काय आहे योजना? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणुकीवर सर्वात जास्त व्याज मिळाले. शिवाय यात गुंतवणूकदाराला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता.

पोस्टाची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला एका खात्याद्वारे कमीत कमी रु 1,000 आणि जास्तीत जास्त रु 9 लाख गुंतवता येतील. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम असे तिचे नाव आहे. हे लक्षात ठेवा की संयुक्त खात्यात पैसे जमा करण्याची जास्तीत जास्त मर्यादा 15 लाख रुपये इतकी आहे. पती-पत्नीला 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.

सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी ही योजना फायदेशीर असून एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोकांना गुंतवणूक करता येईल.अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर पैसे जमा करता येतात. या प्रकारच्या खात्यात गुंतवणूक 3 लाख रुपयांपर्यंत असून या योजनेत जमा करण्यासाठी पोस्ट ऑफिस फॉर्म भरावा लागणार आहे.

या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते चालू करावे लागेल. सध्या, या योजनेत 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे, हा इतर FD योजनांपेक्षा चांगला पर्याय असून खाते चालू करण्यासाठी ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो इ महत्त्वाची कागदपत्रे गरजेची आहेत.

किती वेळ करता येते गुंतवणूक?

हे लक्षात घ्या की पोस्ट ऑफिसच्या या योजनेची परिपक्वता 5 वर्षे असून वेळेपूर्वी पैसे काढले तर नुकसान सहन करावे लागेल. एक वर्षाच्या आत पैसे काढण्याची तरतूद यात नसते. समजा 3 वर्षापूर्वी पैसे काढले तर तुम्हाला 2 टक्के दंड भरावा लागू शकतो. तुम्ही 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर 1 टक्के रक्कम कापून तुम्हाला मिळेल.

जाणून घ्या खात्याचे फायदे

तुम्हाला हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये शिफ्ट करता येते. 5 वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रक्कम पुन्हा गुंतवता येईल. या योजनेत नॉमिनीचीही नियुक्ती करतात. ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली तर नॉमिनीला सर्व पैसे मिळतात. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टीडीएस देखील कापला जात नसला तरी मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो.