Realme Narzo N55 : अखेर ठरलं! ‘या’ दिवशी भारतात लॉन्च होणार रियलमीचा शक्तिशाली स्मार्टफोन, पहा किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme Narzo N55 : रियलमीचा नवीन स्मार्टफोन Realme Narzo N55 लाँच होण्यास सुसज्ज झाला आहे. जो फक्त 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. जर तुम्हाला तो विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला Amazon वर जावे लागणार आहे.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा कारण आगामी स्मार्टफोन भारतात 12 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंगसह ऑफर करण्यात येणार आहे. यात कंपनी शानदार फीचर्स देत आहे.

तुम्हाला Realme Narzo N55 हा स्मार्टफोन Amazon वरून खरेदी करता येईल. कंपनीच्या मतानुसार, आगामी स्मार्टफोन हा त्याच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान चार्जिंग फोन असणार आहे. जो फक्त 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल असा दावाही कंपनीने केला आहे.

आगामी फोन 33W SUPERVOOC वायर चार्जिंग Realme Narzo N55 सह उपलब्ध असणार आहे. यात टाइप-सी पोर्ट उपलब्ध असणार आहे. हा फोन प्राइम ब्लू रंगात सादर करण्यात येणार असून याच्या मागील पॅनलवर दोन कॅमेरे असणार आहे. तसेच या कॅमेरासोबत एलईडी लाईट उपलब्ध असणार आहे. हा 7.89mm पातळ असणार आहे.

हा फोन टॉप व्हेरियंटच्या चार स्टोरेज प्रकारांमध्ये म्हणजेच 4GB + 64GB, 4GB + 128GB, 6GB + 64GB आणि 6GB + 128GB मॉडेलमध्ये लॉन्च होऊ शकतो. परंतु अजूनही कंपनीने या फोनच्या किंमतीची पुष्टी केली नसली तरी गेमिंग प्रेक्षकांच्या उद्देशाने ही मध्यम श्रेणीची ऑफर असण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच हा फोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत विकला जाऊ शकतो.