Sainath Babar : “राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, नाराज असण्याचा प्रश्न नाही”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.

मशिदीवरील (Mashid) भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर पुणे मनसेतून ही नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती मिळत आहे.

मनसेच्या मुंबई आणि कल्याण या ठिकाणच्या कार्यक्रमात हनुमान चालीसा लावण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात हनुमान चालीसा रद्द करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील मनसे नगरसेवक नाराज असल्याची माहिती मिळत होती.

पुण्यातील (Pune) मनसे नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) आणि वसंत मोरे (Vasant More) हे नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्यानंतर नगरसेवक साईनाथ बाबर यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. नाराज असण्याचा प्रश्न नाही. अशी प्रतिक्रिया साईनाथ बाबर यांनी दिली आहे. साईनाथ बाबर हे नाराज असल्याची माहिती अख्या शहरभर पसरली होती. त्यानंतर आज त्यांनी याबाबत खंडन केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे वक्तव्य केल्यानंतर साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

कारण या दोन्ही नेत्यांच्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे. याचा परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो. त्यामुळे हे नगरसेवक नाराज असल्याची माहिती मिळत होती.

राज ठाकरेंचे यांच्या वक्तव्यानंतर मनसे पक्षामध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. माजिद शेखनंतर यांनी शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा दिला आहे. शेहबाज पंजाबी हे मनसे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आहेत.