Samsung Smartphone Offer : सॅमसंगची सर्वात भारी ऑफर! Galaxy A सीरीज MRP पेक्षा स्वस्तात येईल खरेदी करता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Smartphone Offer : तुम्ही आता सॅमसंगच्या स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीचं आपल्या वेबसाइटवर अशी ऑफर देत आहे. आता तुम्ही 20 ते 25 हजार रुपयांच्या सवलतीत फोन खरेदी करू शकता. Galaxy A सीरीज MRP पेक्षा स्वस्तात तुम्हाला खरेदी करता येईल. पहा ऑफर.

जाणून घ्या Galaxy A23 5G वर मिळणारी ऑफर

स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनची मूळ किंमत 30,990 रुपये इतकी आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला फोन 7,991 रुपयांच्या सवलतीनंतर 22,999 रुपयांना खरेदी करता येईल. समजा जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे कार्ड वापरले तर तुम्हाला 2,000 रुपयांची झटपट सवलत देखील मिळेल.

जर तुमच्याकडे Samsung Axis Bank क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10% कॅशबॅक देखील मिळेल. या फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये 1080×2408 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.6 इंच डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल आणि फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50-मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच यात सेल्फीसाठी तुम्हाला 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल.

जाणून घ्या Galaxy A14 5G वर मिळणारी ऑफर

किमतीचा विचार केला तर या सॅमसंग फोनची मूळ किंमत 22,999 रुपये इतकी आहे. 3 हजार रुपयांच्या सवलतीनंतर ते 19,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध असेल. तसेच तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला 1500 रुपयांची स्वतंत्र झटपट सवलत मिळेल.

सॅमसंग अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना त्या फोनच्या खरेदीवर 10% कॅशबॅक मिळेल. या फोनचा डिस्प्ले 6.6 इंच असून जो 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. यात कंपनीने 90Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, तुम्हाला फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. तर त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देत आहे.