राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते. ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती.

त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. चौकशीवेळी आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय.

याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.