Smart TV Offer : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा लोकप्रिय कंपन्यांचे 43 इंच स्मार्ट टीव्ही, पहा लिस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smart TV Offer : अनेक कंपन्या आपले स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत. मागणी जास्त असल्याने या टीव्हीची किंमत खूप जास्त असते. अनेकांना इच्छा असून ते खरेदी करता येत नाही. परंतु जर तुम्ही स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही Xiaomi,OnePlus, Hisense यांसारखे लोकप्रिय कंपनीचे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. पहा संपूर्ण ऑफर.

Xiaomi 43-इंच X-सीरिज

Xiaomi चा हा स्मार्ट टीव्ही जो मेटल बॉडी आणि बेझल-लेस डिझाइनसह येतो. किमतीचा विचार केला तर बँक ऑफरसह 17,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तुम्ही Amazon वर हा टीव्ही 42,999 रुपयांच्या लॉन्च किमतीच्या तुलनेत 22,990 रुपयांना लिस्ट केला आहे. तर डॉल्बी अॅटमॉस, ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी शिवाय, यात 3.5 मिमी हेडफोन जॅकसाठी समर्थन असेल. यामध्ये क्वाल-कोर A55 प्रोसेसर दिला आहे.

OnePlus 43 Y1S Pro

कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही 39,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला होता परंतु तो तुम्ही Amazon सेलमध्ये 24,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला बँक ऑफर्ससह या टीव्हीवर अतिरिक्त सवलतींचा लाभ मिळेल. बेझल-लेस डिझाइनशिवाय या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा-एचडी रिझोल्यूशन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह शक्तिशाली स्पीकर देण्यात आले आहेत. हा टीव्ही अनेक OTT अॅप्स आणि स्क्रीनकास्टिंगला सपोर्ट करेल.

Hisense E7K स्मार्ट VIDAA टीव्ही

ग्राहकांना हा टीव्ही 46,999 रुपयांच्या लॉन्च किमतीसह 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. कंपनीच्या या टीव्हीमध्ये अनेक OTT अॅप्स समर्थित असून ते VIDAA ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. शक्तिशाली ऑडिओसाठी, यामध्ये 24W ड्युअल स्पीकर सेटअप दिला आहे. या टीव्हीमध्ये QLED डिस्प्ले तंत्रज्ञान असेल जे 4K टेकपेक्षा चांगले मानले जाते.

Kodak CA Pro Android TV

किमतीचा विचार केला तर कोडॅक स्मार्ट टीव्हीची लॉन्च किंमत 39,999 रुपये ठेवली होती. परंतु तुम्ही या सेल दरम्यान त्याची किंमत 23,999 रुपये झाली आहे. यावर अनेक बँक ऑफर्सचा लाभ मिळेल. अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीमसह, गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट सपोर्ट यात दिला आहे. हा टीव्ही अल्ट्रा HD (4K) रिझोल्यूशन तसेच 40W चा शक्तिशाली स्पीकर सेटअप देतो.

Redmi 43-इंच फायर टीव्ही एफ-सीरिज

हा टीव्ही Amazon वर 20,999 रुपयांना सूचीबद्ध केला असून त्यावर 51% सवलत देत आहे. या टीव्हीची मूळ किंमत 42,999 रुपये असून तो बेझल-लेस डिझाइनसह येतो. यामध्ये HDR10 सपोर्टसह 4K अल्ट्रा-एचडी रिझोल्यूशनसह डिस्प्ले आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह शक्तिशाली स्पीकर दिला आहे.