विजेचा सुरु असलेला खेळखंडोबा सुरळीत करा, अन्यथा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- महावितरणच्या वाढीव वीजबिलामुळे आधीच नागरिक हैराण झाले आहे आता यातच सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याच मुद्द्यावरून कोपरगावात भाजपच्या वतीने महावितरण विभागाला इशारा देण्यात आला आहे. गेल्या काहीदिवसांपासून कोपरगाव शहरात कमी जास्त दाबामुळे वीजपुरवठा विस्कळीत होत आहे.

कमी अधिक दाबाने होणार्‍या वीजपुरवठयामुळे अनेक कुटुंबाच्या घरातील विदयुत उपकरणे जळून जात असल्याने या कोरोना महामारीच्या संकटात आणखी आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे.

त्यातच वीज विभागाकडून थकीत बिलांची आकारणी सुरू केली आहे. या गोंधळामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असुन घरातील विविध विदयुत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

त्यातच वीज विभागाच्या कार्यालयाकडुन विदयुत पुरवठा कट करण्याची मोहीम राबविली जात आहे. ही अन्यायकारक मोहिम थांबवुन वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा भारतीय जनता पार्टी,

युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीचे कोपरगाव अर्बनचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता यांना भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.