Solar Generator : आता लाईट गेली तरी काळजी करू नका! ‘या’ ठिकाणी मिळत आहेत स्वस्त ‘पोर्टेबल सोलर जनरेटर’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Generator : आजकाल अनेकजण त्यांच्या घरातील विजेसाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे जनरेटर (Generator) वापरत आहेत. परंतु या जनरेटरमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण (Pollution) होते, त्याचबरोबर पैसाही खर्च होतो.

लोकांची ही अडचण लक्षात घेता बाजारात (Market) सध्या पोर्टेबल सोलर जनरेटर (Portable Solar Generator) उपलब्ध आहोत. यामुळे प्रदूषणासोबतच खर्चही(Expenses) कमी होत आहे. हे जनरेटर पोर्टेबल असल्यामुळे ते कुठेही नेले जाऊ शकतात.

तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाइटवर (E-commerce websites) आणि बाजारात 10 ते 20 हजारांच्या किमतीत अनेक प्रकारचे सोलर जनरेटर सहज मिळतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते खरेदी करू शकता. या पोर्टेबल सोलर जनरेटरमध्ये तुम्हाला अनेक खास फीचर्स मिळत आहेत. यामध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टीम देखील मिळत आहे.

सोलर जनरेटरमध्ये तुम्हाला इनबिल्ट बॅटरी (Inbuilt battery) मिळते, जी सौरऊर्जेद्वारे चार्ज होते. चार्जिंग केल्यानंतर, तुम्ही फॅन चालवण्यासाठी, बल्ब लावण्यासाठी किंवा इतर कामांसाठी सौर जनरेटर वापरू शकता.

याशिवाय, तुम्हाला अनेक सोलर जनरेटरमध्ये चार्जिंग पॉवर प्लग आणि यूएसबी पोर्ट देखील मिळतात. तुमचा मोबाईल फोन किंवा इतर आवश्यक गॅझेट चार्ज करण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर करू शकता.

पोर्टेबल सोलर जनरेटरमध्ये तुम्हाला चांगली mAH बॅटरी मिळत आहे. तुमच्या घरी वारंवार वीज खंडित होत असल्यास. अशा परिस्थितीत तुम्ही सौरऊर्जेवर चालणारे हे सौर जनरेटर खरेदी करू शकता. याद्वारे, बल्ब आणि पंखे वापरण्याव्यतिरिक्त, आपण लॅपटॉप आणि मोबाइल देखील चार्ज करू शकता.