Soybean Rate: आनंदाची बातमी! सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi News Marathi: राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean Growers) हंगामाच्या अंतिम टप्प्यात दिलासादायक बातमी समोर येतं आहे.

मागील तीन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होतं असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मोठा आनंदी असल्याचे बघायला मिळतं आहे.

खरं पाहता, यावर्षी सुरवातीला सोयाबीनला (Soybean Rate) चांगला दर मिळत होता मात्र मध्यंतरी केंद्र सरकारने (Central Governement) सोयापेंड आयातिला मंजुरी दिल्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली.

यामुळे दरवाढीच्या अनुषंगाने साठवणूक केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात मामुली बढत बघायला मिळाली होती.

मात्र पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात घसरण झाली आणि आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दरात वाढ नमूद केली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात (Washim) सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली आहे.

यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती त्या शेतकऱ्यांना (Farmers) या दरवाढीचा मोठा फायदा होत आहे.

तसेच उन्हाळी हंगामात (Summer Season) सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या दरवाढीचा फायदा होतं असल्याचे समजतं आहे.

खरं पाहता, वाशीम जिल्ह्यात आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीनची विक्री होत होती. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळात सोयाबीन दहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार अशी आशा होती.

यामुळे त्यावेळी चांगला समाधानकारक बाजार भाव मिळत असताना देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता सोयाबीनची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला.

मात्र सोयाबीनला त्यावेळी चांगला दर मिळत असल्याने सोयाबीन तेल प्रचंड महागले आणि म्हणून शासनाने पुढील दोन वर्षांकरिता प्रतिवर्षी आणि प्रत्येकी 20 लाख मेट्रिक टन कच्चे सोयाबीन आणि कच्च्या सूर्यफुल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली.

यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली. यामुळे सोयाबीन साठवणूक करून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मित्रांनो दोन दिवसापूर्वी वाशीमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता.

शुक्रवारी त्यात अडीचशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आली. म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनला 6 हजार 780 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला.

वाशिमचा कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील सोयाबीनला 6,700 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत आहे. यामुळे निश्चितच हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.