जिल्ह्यातील ‘ या’ पोलीस निरीक्षकाविरुद्ध नाशिकला ‘आयजीं’ना निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील खंडाबे येथे दलित कुटुंबावर झालेल्या अन्याय अत्याचाराची दखल न घेता कर्तव्यात कसुर करून जातीय द्वेषाने आरोपींना पाठिशी घालणारे पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांना सहआरोपी करुन निलंबित करावे.

या मागणीसाठी पोलीस महानिरिक्षक नाशिक कार्यालयासमोर आरपीआय व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने दि. १३ जुलै रोजी प्रांणातिक उपोषण करण्याचे निवेदन आज पोलिस महानिरीक्षक यांना देण्यात आले.

पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील खंडाबे येथील दलित साळवे कुटुबांतील मुलींनी सार्वजनिक पानवठ्यावरील खाणीत जनावरांना पाणी पाजल्याच्या कारणाने जातीय द्वेषातुन मारहाण केली.

मुलीपैकी एक मुलगी मंती मंद होती. तरी तिलाही अमानुष बेदम मारल्याने ती गंभीर जखमी झालेली आहे. या दरम्यान राहुरी पोलीसांनी फिर्याद नोदवुन न घेता आरोपींना पाठीशी घालुन जातीय द्वेषाने अत्याचारीत कुटुंबाला अपमानास्पद वागवणुक देऊन खोटया गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यातील आरोपी बाळासाहेब लटके हा पंचायत समीती सदस्य असून राजकीय सत्ताधारी पक्षाचा असल्याने राजकिय दबावाखाली पोलीस निरीक्षकांनी आरोपींना त्यात अभय दिला आहे.

त्यांची अनुसुचित जाती -जमाती कायद्या अंतर्गत फिर्याद न नोंदविता उलट बाळासाहेब लटके यांना सांगितले की, हे कुंटुब तुमच्यावर अँट्रासिटीचा गुन्हा नोंदवित असेल तर तुम्ही दरोडयाचा ३९५ गुन्हा नोंदवा असे सांगितले.

व दि. ५ जुन २०२१ रोजी झालेल्या घटनेची दि. २२ जुन २०२१ रोजी वंचित बहुजन आघाडी यांनी मोर्चाचे निवेदन दिल्यानंतर त्यांनी घाईघाईने पिडीत कुटूंबाचा जबाब न घेता सायंकाळी अँट्रासिटीचा गुन्हा दाखल केला.

त्यातही खरी फिर्याद व खरे आरोपी फिर्यादीमध्ये न घेता जवळ जवळ १७ दिवसांचा उशीर लावला. व आरोपींना मोकळीक दिली. त्यामुळे असे स्पष्ट होते की, सदर अधिकाऱ्यांने आपल्या कर्तव्यात कसुर केलेला आहे.

त्यामुळे नवा अँट्रासिटी कायदा एस. सी. एस.टी. ची तक्रार नोंदवुन न घेणाऱ्या सदर पो. नि. नंदकुमार दुधाळ यांना सहआरोपी करून निलंबीत करावे व वरिष्ठांनी संबधितांवर गुन्हा दाखल करावा. योग्य न्याय दयावा व संबधीत पोलीस निरिक्षक यांना सह आरोपी करून त्यांना निलंबित करावे.

यासाठी रिपाइंचे शहराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने व वंचितचे बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे यांनी पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.]