Steel Rate Today : घर बांधायचे स्वप्न होणार पूर्ण ! स्टील आणि सिमेंटच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या आजचे दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel Rate Today : छोटेसे का होईना घर (Home) असण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घराच्या साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे अनेकांना घर बांधणे कठीण झाले होते. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र घर बांधणाऱ्यांसाठी आनांदाची बातमी आहे. स्टील (Steel) आणि सिमेंटचे (Cement) दर घटले आहेत.

घर बांधण्यासाठी लोक वर्षानुवर्षे पैसे जोडतात. महागाईने अशा लोकांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. जर तुम्ही फक्त घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. घरे बांधण्यासाठी वापरले जाणारे स्टील, वाळू (Sand), सिमेंट, विटा या साहित्याच्या किमती कमालीच्या कमी झाल्या आहेत.

स्टीलबद्दलच बोलायचे झाले तर गेल्या दोन-तीन महिन्यांत त्याची किंमत निम्म्यावर आली आहे. या आठवड्यात स्टीलचे दरही 1,100 रुपये प्रति टनपर्यंत घसरले. याशिवाय सिमेंट, विटा आणि वाळूच्या किमतीत लक्षणीय घट (Falling Rates) झाली आहे.

बांधकाम साहित्याच्या किमतीत घट

बांधकाम साहित्याच्या किमती अलीकडे लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. कारण देशांतर्गत बाजारपेठेतील किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने स्टीलवरील निर्यात शुल्क का वाढवले.

परिणामी, देशांतर्गत बाजारात स्टील उत्पादनांच्या किमती झपाट्याने कमी झाल्या. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने डिझेल आणि पेट्रोलवरील करही कमी केला आहे.

यामुळे शिपिंग खर्च कमी झाला, ज्यामुळे जवळजवळ प्रत्येक गोष्टीची किंमत कमी करण्यात मदत झाली. त्याच वेळी, पावसाळा सुरू झाला की, बांधकामाचे काम कमी होऊ लागते, त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणी आपोआपच कमी होऊ लागते.

यासोबतच रिअल इस्टेट क्षेत्राची वाईट स्थितीही त्यामागे आहे. या कारणांमुळे विटा, सिमेंट, स्टील, वाळूची मागणी घटली आहे.

स्टीलची किंमत

नोव्हेंबर 2021– 70000
डिसेंबर 2021– 75000
जानेवारी 2022- 78000
फेब्रुवारी 2022– 82000
मार्च 2022 – 83000
एप्रिल 2022- 78000
मे 2022 (सुरू झाले) – 71,000
मे 2022 (शेवट) – 62-63000
जून 2022 (सुरू होत आहे) – 48-50,000
जून 2022 (9 जून): 47-48000

भारतातील प्रमुख शहरांमध्ये आता स्टीलच्या किमती

दुर्गापूर (पश्चिम बंगाल): 45,300 44,200
कोलकाता (पश्चिम बंगाल): 45,800 44,700
रायगड (छत्तीसगड): 48,700 48,500
राउरकेला (ओडिशा): 50,000 49,500
नागपूर (महाराष्ट्र): 51,000 50,500
हैदराबाद (तेलंगणा): 52,000 52,000
जयपूर (राजस्थान): 52,200 52,700
भावनगर (गुजरात): 52,700 52,400
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): 52,900 52,100
गाझियाबाद (उत्तर प्रदेश): 53,000 53,400
इंदूर (मध्य प्रदेश): 53,500 53,700
गोवा: 53,800 53,800
जालना (महाराष्ट्र): 54,000 53,800
मंडी गोविंदगड (पंजाब): 54,300 53,800
चेन्नई (तामिळनाडू): 55,000 54,000
दिल्ली: 55000-54700
मुंबई (महाराष्ट्र): 55,200 54,100
कानपूर (उत्तर प्रदेश): 57,000 56,100