Successful Farmer: भावा फक्त तुझीच हवा…! पट्ठ्याने 50 हजारात सुरु केली मोत्याची शेती, आज कमवतोय तब्बल 9 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: देशातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती (farming) मध्ये मोठा बदल करत आहेत. आता अनेक नवयुवक शेती वं शेतीशी निगडित उद्योगात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. शेतीशी निगडित व्यवसाय नव युवकांना लाखों रुपयांची कमाई देखील करून देत आहे. राजस्थान मधील एका अवलिया नवयुवकाने देखील जरा हटके विचार करत पर्ल फार्मिंग या शेतीपूरक व्यवसायात (Business) पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या नवयुवकाने या क्षेत्रात चांगले नेत्रदीपक यश मिळवले असून पर्ल फार्मिंगच्या (pearl farming business) माध्यमातून हा राजस्थानचा (rajasthan) भूमिपुत्र वर्षाकाठी नऊ ते दहा लाख रुपये कमावण्याची (farmer income) किमया साधत आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या अवलिया नवयुवकाच्या यशाविषयी सविस्तर.

राजस्थानच्या जयपूर येथील रहिवासी नरेंद्र गरवा या नवयुवकाने पर्ल फार्मिंगच्या माध्यमातून वार्षिक 9 लाख रुपये कमवण्याची किमया साधली आहे. त्यांनी सांगितले की, तो 2015 पासून मोत्याची शेती करत आहेत. पूर्वी तो पुस्तके विकायचा, पण पुस्तकांची विक्री कमी झाल्यावर आणि दुकानातून नाममात्र उत्पन्न मिळु लागल्यावर त्याने दुसरे काही काम करण्याचा विचार केला. काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने इंटरनेटवर मार्ग आणि सूचना शोधू लागलो.  इंटरनेटच्या माध्यमातून त्याला टेरेस फार्मिंगची माहिती मिळाली आणि त्यात यश मिळाल्यावर आपण आणखी काही करू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या मनात आला. ते म्हणतात, “मी यूट्यूब पाहिल्यानंतरच मोत्यांची लागवड करायला सुरुवात केली. मी सुरुवात केली तेव्हा मला या विषयाचे फारसे ज्ञान नव्हते. 2015 पर्यंत, मी स्वतः मोत्यांची शेती केली पण त्यांचा मृत्यूदर खूप जास्त होता. कारण मला तेवढे ज्ञान नव्हते. म्हणून मग मी CIFA या सरकारी संस्थेत 5 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. 2017 मध्ये मी ओडिशात जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मी 3000 ऑयस्टर्सपासून सुरुवात केली आणि आज माझी स्वतःची संस्था आहे जिथे मी लोकांना प्रशिक्षण देतो. मी तरुण आणि महिलांना शिकवतो जेणेकरून त्यांनाही रोजगाराच्या संधी मिळतील.

गरवा 8-9 लाख रुपये कमावतो

ते सांगतात, “घरच्यांना सांगितल्यावर त्यांना खूप राग आला की त्यांनी एक चांगलं दुकान सोडून काय सुरुवात केली.  राजस्थानात मोती पिकण्याची शक्यता फारच कमी होती.  इथे प्यायला पाणी नाही त्यामुळे मोती कुठून उगवणार असा प्रश्न लोकांना पडला. यावर नरेंद्रने कमी पाण्यात मोती उगवायचे ठरवले. 17 लिटर पाण्यात 35 मोती उगवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. ते स्पष्ट करतात, “माझ्या एनजीओचा दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे, एक दिवस सिद्धांत आणि एक दिवस व्यावहारिक. त्यांनी सांगितले की mi प्रशिक्षण घेतलेल्या केंद्रात मोत्यांसह मत्स्यशेती शिकवले जात असे, परंतु आम्ही फक्त मोती शेती शिकवतो. मी वर्षाला 8-9 लाख रुपये कमावतो आणि त्यासाठी जास्त देखभाल करण्याची गरज नाही.