Technology News Marathi : Realme चा 150W चार्जिंग सपोर्टवाला स्मार्टफोन भारतात ‘या’ दिवशी होणार लॉन्च

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Technology News Marathi : Realme GT Neo 3 स्मार्टफोन (Smartphone) लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने लॉन्च डेट क्लिअर केली आहे. Realme GT Neo 3 29 एप्रिल रोजी भारतात (India) लॉन्च होईल. हा फोन काही काळापूर्वी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. कंपनीचा हा पहिला फोन आहे ज्यामध्ये 150W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

Realme GT Neo 3 किंमत

Realme GT Neo 3 च्या किंमतीबद्दल कंपनीकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. पण, त्याच्या भारतीय किंमतीचा अंदाज त्याच्या चिनी किमतीवरूनही लावता येतो. Realme GT Neo 3 ची किंमत 80W आवृत्तीसाठी CNY 1,999 (सुमारे 24,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.

तर त्याच्या दुसऱ्या वेरिएंटमध्ये 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्याची किंमत CNY 2,699 (सुमारे 33,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

Realme GT Neo 3 चे तपशील

Realme GT Neo 3 मध्ये अनेक फ्लॅगशिप लेव्हल फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6.7-इंचाची 2K स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. त्याचा टच सॅम्पलिंग रेट 1000Hz आहे आणि तो HDR10+ ला सपोर्ट करतो.

कंपनीने यामध्ये Octa core MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर दिला आहे. यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत मेमरी आहे.

Realme GT Neo 3 मध्ये Realme UI 3.0 देण्यात आला आहे. पण, चायनीज व्हेरियंटमध्ये Android 12 ऐवजी Android 11 देण्यात आला आहे. असे मानले जाते की भारतात ते Android 12 सह येऊ शकते.

फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर आहे. हे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करते. यासोबतच मॅक्रो कॅमेरा आणि अल्ट्रावाइड लेन्सही देण्यात आली आहे.

फोनच्या 80W वेरिएंटमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर 150W वेरिएंटमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की 150W ते 50% बॅटरी 5 मिनिटांत चार्ज होईल.