त्या डॉक्टर दाम्पत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- अनेक कोरोना रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले व रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर कारवाई होत रिपब्लिकन पार्टी ऑफ

इंडियाच्या (गवई गट) वतीने निषेध व्यक्त करुन, संबंधीत डॉक्टर दाम्पत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या

निवेदनाद्वारे आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी केली आहे. अन्यथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना महामारीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. किशोर मस्के व डॉ. कौशल्या म्हस्केयांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करुन रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे काम केले.

हॉस्पिटल मधील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन न देता इंजेक्शनची जास्त किमतीत विक्री केली. त्यांच्या हॉस्पिटलवर पोलीस प्रशासनाने छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापि हे दांपत्य फरार आहे. सदर मेडीकलची सर्व जबाबदारी हॉस्पिटलचे मालक असलेले डॉक्टरवर आहे.

परंतु त्यांनी यामध्ये तेथील कामगारांना आरोपी केले. म्हस्के दांपत्यांना जास्त पैसे कमावण्याच्या नादात अनेक कोरोना रुग्णांचा जीव गेला. भिंगार कॅम्पचे पोलीस या डॉक्टरांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होण्यासाठी आरपीआयच्या वतीने उपोषण करण्यात आले. परंतु पोलीस प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे देत उपोषण स्थगित करण्यास भाग पाडले. या हॉस्पिटलमध्ये अजूनही कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून,

जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी अजून रुग्ण दगावण्याची शक्यता असून, सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन याचा तपास एलसीबी मार्फत करण्यात यावा, म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|