मानलं भावा….! पेशा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पण; आज शेती करतोया; लाल भेंडीचे यशस्वी उत्पादन घेतोया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer succes story : आत्तापर्यंत तुम्ही हिरवी भेंडी (Okra) पाहिली असेल आणि आवडीने ताव देऊन खाल्ली देखील असेल, पण तुम्ही कधी लाल भेंडी खाल्ले आहे का? नाही.

अहो मग लाल भेंडी अवश्य सेवन करा कारण की लाल भेंडीत मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळत असतात. ही अनोखी लाल भेंडी राजस्थानच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या वावरात फुलवली (Red Okra Farming) आहे.

उदयपूरच्या शेतकरी कुटुंबातील हेमेंद्र अजमेरा या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने लाल भेंडी यशस्वी लागवड (Okra Cultivation) करण्याची किमया साधली आहे. हेमेंद्र यांना शेतीची खुपच आवड त्यामुळे शेतीत ते सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करतच असतात.

लाल भेंडीची शेती देखील असाच एका प्रयोगाचा भाग आहे. हेमेंद्र यांनी लागवड केलेल्या भेंडीचे पहिले पीक आता उतरण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळी शेती आणि दिवसभर ऑफिसची कामे
टेकरी येथील रहिवासी हेमेंद्र अजमेरा यांनी सांगितले की, ते व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असून शेती हा त्यांचा छंद आहे. दकणकोत्रा ​​भागात त्यांचे स्वतःचे शेत आहे, जेथे ते वडील भगवतीलाल यांच्यासोबत शेती करतात.

ते पहाटे 5 वाजता उठून शेतात पोहोचतात आणि 9 वाजेपर्यंत काम करतात आणि घरून ऑफिसचे काम करतात. त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांनी लाल भेंडीबद्दल ऐकले होते, तेव्हा त्यांनी त्याची लागवड करण्याचा विचार केला.

त्याने त्याचे बियाणे बंगळुरूहून आणले आणि भेंडीच्या सामान्य पिकासह लाल भेंडीची ही नवीन जात लागवड करण्यास सुरुवात केली. आता भिंडीचे पीक तयार झाले आहे. त्यांना शेतीतील नावीन्य आवडते. यापूर्वी त्यांनी लाल कोबीचीही लागवड केली आहे.

शुगर आणि बीपीच्या रुग्णांसाठी लाल भेंडी आहे फायदेशीर
अजमेरा सांगतात की, लाल भेंडीची चव हिरव्या भेंडीसारखीचं असते आणि ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भेंडी विशेषतः फायदेशीर आहे.

या भेंडीमध्ये वेगळे जीन टाकल्यामुळे तिचा रंग लाल झाला आहे. यामध्ये क्रूड फायबर असते ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल रोखण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही हे उपयुक्त आहे.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी या लाल भेंडीची मोठ्या प्रमाणात लागवड सुरु केली आहे आणि त्यांना नफाही मिळत आहे.