महसूलमंत्री म्हणाले…सरकार कोसळावे यासाठी काही लोक दिवसा स्वप्न पाहतायत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच शैलीत विरोधकांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे.

मंत्री थोरात म्हणाले कि, काही लोक सरकार कोसळावे यासाठी पाण्यात देव घालून बसले असून दिवसा स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट झाली.

या पार्श्‍वभूमीवर ना. थोरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट लोकशाहीला धरुनच आहे. याचा कुठलाही परिणाम राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेवर होणार नाही.

पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पंतप्रधानांची विविध विषयावर भेट घेणे काही गैर नाही. ही लोकशाही आहे. राज्यातील अनेक प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत मध्ये आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांसह दिल्लीच्या सीमेवर असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये 500 शेतकर्‍यांनी हुतात्मे पत्करले आहे. राजकारणातील दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.

या भेटीचा महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नसून दोन वर्षे या सरकारने अत्यंत चांगले काम केले आहे. पुढील तीन वर्षे ही सरकार चांगलेच काम करणार आहे.