रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या संपत्तीची

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कडे असलेल्या अपसंपदेची आयकर खात्याने उघड चौकशी करावी, असे स्मरण पत्र जेष्ठ वकील अॅड.सुरेश लगड यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्तांना दिले आहे.

प्रतिकूल परिस्थितीत हा बाळ बोठे हा झटपट (आर्थिक दृष्ट्या) मोठा झाला. बोठेची सुरवातीची आर्थिक परिस्थिती व आताची आर्थिक परिस्थिती काय आहे

याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली, तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील, अशी मागणी लगड यांनी आयकर विभागाकडे केली आहे.

बोठेचे उत्पन्न व त्याच्या कडे असलेली ज्ञात, अज्ञात,जंगम मिळकत, कॅश रक्कम याची चौकशी केली तर पत्रकरिता क्षेत्रातील ही व्यक्ती इतक्या झटपट श्रीमंत कशी होऊ शकते? व त्यास भरीव असे उत्पन्नाचे कोणते साधन होते कि इतकी माया गोळा करू शकला?.

अनेक संस्थांमध्ये स्लीपिंग पार्टनर, पुण्याच्या काही हॉस्पिटलमध्ये पार्टनर, सावेडीत १५ एकर क्षेत्र, भीस्तबाग परिसरात ७ एकरचा मोठा प्लॉट, भिंगार येथे ५ एकरची जागा अशी ज्ञात संपत्ती असल्याचे समजते.

याव्यतिरिक्त काही अज्ञात संपती असेल त्याची संपूर्ण चौकशी आयकर खात्याने करणे आवश्यक आहे, असे लगड यांनी पत्रात म्हटले आहे.