Trending News Today : जगातील पहिली १०० फूट लांब कार ! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या या कारमध्ये स्विमिंग पूलसह इतरही खास वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Trending News Today : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा (Guinness World Records) विक्रम मोडणारी जगातील सर्वात लांब कार (Car) म्ह्नणून ओळख निर्माण करणारी अमेरिकन ड्रीम कार (American dream car) सध्या मोठ्या प्रेमात चर्चेत आहे.

या कारमध्ये स्विमिंग पूल (Swimming pool) सह इतर खास विशिष्ट्ये आहेत. या कारची लांबी १०० फूट असून कारच्या छतावर एक हेलिपॅड (Helipad) देखील आहे. या कारचा समावेश जगातील सर्वात लांब (Longest) असणारी कार म्हणून यादीत समावेश करण्यात आला आहे.

१०० फूट लांब असणारी ही अमेरिकन ड्रीम कारचे नाव यापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवले गेले आहे. पण आता त्यांनी आपलाच जुना रेकॉर्ड (Record) मोडला आहे.

या कारची लांबी ६० फूटांवरून १०० फूट करण्यात आली आहे. ही कारही १.५ इंच रुंद असून कारमध्ये एकूण २६ चाके आहेत. व या कारमध्ये एकावेळी एकूण ७५ लोक बसू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

द अमेरिकन ड्रीम १९८६ मध्ये कॅलिफोर्निया, यूएसए येथील कार कस्टमायझर जे ओहरबर्ग यांनी तयार केले होते, डेली स्टारनुसार, त्याची लांबी ६० फूट होती. नंतर विश्वविक्रम करण्यासाठी त्यांनी ती १०० फुटांपर्यंत वाढवली आहे. तसेच ही कार अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही याआधी दाखवण्यात आली होती.

ही कार बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाला आहे. एक काळ असा होता, की ही कार पूर्णपणे भग्नावस्थेसमान होती, परंतु नंतर एका संग्रहालयाचे मालक असलेल्या मायकेल मॅनिंग नावाच्या व्यक्तीने तिचा पुनर्विकास केला आहे.

ही कार रिस्टोअर करण्यासाठी त्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. ते नंतर फ्लोरिडाच्या डेझरलँड पार्क कार म्युझियमचे मालक मायकेल डेझर यांनी या कारला विकत घेतले व या कारला सर्वांसाठी चर्चेचा विषय बनवले आहे.